"चार-चार व्हॅनिटी व्हॅनशिवाय कामच करत नाहीत" फराह खानने केली कलाकारांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:10 PM2024-04-21T14:10:08+5:302024-04-21T14:10:55+5:30

कलाकारांचे नखरे! फराह खानने सांगूनच टाकलं

Farah Khan reveals stars demand 4 vanity vans before shoot otherwise they wont start shooting | "चार-चार व्हॅनिटी व्हॅनशिवाय कामच करत नाहीत" फराह खानने केली कलाकारांची पोलखोल

"चार-चार व्हॅनिटी व्हॅनशिवाय कामच करत नाहीत" फराह खानने केली कलाकारांची पोलखोल

फराह खान (Farah Khan) बॉलिवूडची सर्वात यशस्वी दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. 'मै हू ना', 'ओम शांती ओम' सारखे अनेक चित्रपट तिने दिग्दर्शित केले आहेत. फराहने नुकतंच स्वत:चं युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. यामध्ये ती सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा करते. एका एपिसोडमध्ये फराहने कलाकारांच्या अवाजवी मागण्यांवर निशाणा साधला. काही कलाकारांना सेटवर ४ व्हॅनिटी व्हॅन हव्या असतात नाहीतर ते शूटही करत नाहीत म्हणत तिने पोलखोल केली आहे.

शाहरुख खानपासून ते रणवीर सिंह, रणबीर कपूरसोबत काम करणाऱ्या फराह खानने आता कलाकारांचीच कानउघाडणी केली आहे. युट्यूब पॉडकास्टमध्ये फराह म्हणाली, "आजकाल स्टार्स काम करत नाही जोपर्यंत त्यांच्यासमोर व्हॅनिटी व्हॅन उभी केली जात नाही. हे लोक चार-चार व्हॅनिटीची मागणी करतात. प्रत्येक कलाकारची आज तीच मागणी असते. एक व्हॅन जिमसाठी, एक स्टाफसाठी, एक स्वत:साठी आणि एक फूड ट्रक म्हणून हवी असते."

ती पुढे म्हणाली, "पूर्वीच्या काळी अभिनेत्री झाडामागेही कपडे बदलायच्या आणि आम्ही टॉवेल पकडून त्यांना कव्हर करायचो. जेव्हा आऊटडोअर शूट असायचं मग ते स्वित्झर्लंड का असेना अभिनेत्री बसच्या मागेही कपडे बदलायच्या. आम्ही चादर घेऊन त्यांच्या सभोवताली घेर करायचो. आता कलाकार व्हॅनिटी व्हॅनशिवाय कामच सुरु करत नाहीत."

व्हॅनिटी व्हॅन अशी आलिशान कार असते ज्यामध्ये रेस्टरुम, बेडरुम, जिम, पँट्री, मेकअप रुम, वॉशरुम अशा सर्वच सुविधा असतात. अनेक ठिकाणी शूटिंग सेटवर हमखास व्हॅनिटी व्हॅन बघायला मिळतात. संजय दत्तकडे तर देशातील सर्वात महागडी व्हॅनिटी आहे.

Web Title: Farah Khan reveals stars demand 4 vanity vans before shoot otherwise they wont start shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.