फराह खानने मलाइका अरोराला दिली शिवी, मलाइकाने दिले असे उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 11:49 IST2018-01-14T06:19:29+5:302018-01-14T11:49:29+5:30
दिग्दर्शक, अभिनेत्री, कोरिओग्राफर फराह खान तिच्या खोडकर स्वभावासाठी ओळखली जाते. गमती गमतीत फराह बरेच काही बोलून जाते. अलीकडे फराहने ...
.jpg)
फराह खानने मलाइका अरोराला दिली शिवी, मलाइकाने दिले असे उत्तर!!
द ग्दर्शक, अभिनेत्री, कोरिओग्राफर फराह खान तिच्या खोडकर स्वभावासाठी ओळखली जाते. गमती गमतीत फराह बरेच काही बोलून जाते. अलीकडे फराहने मलाइका अरोरा हिला सुद्धा असेच नाही ते बोलून गेली. होय, अलीकडे मलाइकाने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत मलाइकाने सुप्रसिद्ध डिझाईनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. फराहने मलाइकाचा हा फोटो पाहिला अन् कमेंट करण्यापासून ती स्वत:ला रोखू शकली नाही. ‘तुझ्या इच्छाशक्तीला मानावे लागेल, कमिनी.’असे फराहने मलाइकाला उद्देशून लिहिले. फराहने अतिशय गमतीत मलाइकाला ‘कमिनी’ म्हटले. त्यामुळे मलाइकाने तिची ही गमतीत हासडलेली शिवी तितकीच खिलाडू वृत्तीने घेतली. तिनेही उत्तर देताना हसत हसत फराहला ‘कमिनी’ म्हणून टाकले.
![]()
याच फोटोवरून मलाइका ट्रोलही झाली. अनेकांनी हा हॉट फोटो पाहून मलाइका ला टार्गेट केले. ‘मलाइकाने कदाचित याचसाठी घटस्फोट घेतला,’ असे काही युजर्सनी तिच्यासाठी लिहिले. मॉडल व आयटम नंबर मलाइका तिच्या स्टाईलिश लूकसाठी ओळखली जाते. तिचे लूक पाहून ती एका १५ वर्षाच्या मुलाची आई आहे, यावर विश्वास बसत नाही.
![]()
ALSO READ : ४४ वर्षीय मलाइका अरोराचा पुन्हा दिसला हॉट अवतार, शेअर केला बिकिनी फोटो!
गतवर्षी मलाइकाने पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. मलाइका व अरबाज या दोघांचा विवाह १९९८ मध्ये झाला होता. पण तब्बल १८ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ११ मे २०१७ रोजी घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडल्या. काही वर्षांपासून मलाइका आणि अरबाजमधील संबंध फारसे चांगले नव्हते. वृत्तानुसार मलाइका तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करीत असल्याचे अरबाजला समजले होते. त्यामुळेच त्यांच्यात नेहमी या कारणावरून वाद होत होता.
एका साप्ताहिकाला मुलाखत देताना मलाइकाने म्हटले होते की, मी अर्जुनला जवळचा मित्र समजते. मध्यंतरी मलाइका दुबईतील एका बिझनेस मॅनला डेट करत असल्याचेही कानावर आले होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे मलाइकाकडून सांगण्यात आले आहे.