आठ वर्षांने लहान असलेल्या शिरीषसोबत फराहने थाटला संसार, जाणून घ्या कशी सुरु झाली होती लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 09:00 IST2020-01-09T09:00:00+5:302020-01-09T09:00:00+5:30

शिरीष आणि फराहची लव्हस्टोरी कोणत्या सिनेमांपेक्षा कमी फिल्मी नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तो एका कंपनीत काम करायचा.

Farah khan birthday know about her love story with shirish kunder | आठ वर्षांने लहान असलेल्या शिरीषसोबत फराहने थाटला संसार, जाणून घ्या कशी सुरु झाली होती लव्हस्टोरी!

आठ वर्षांने लहान असलेल्या शिरीषसोबत फराहने थाटला संसार, जाणून घ्या कशी सुरु झाली होती लव्हस्टोरी!

बॉलिवूड प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानच्या आज वाढदिवस आहे. बिनधास्त स्वभावाची दिग्दर्शिका म्हणून फराहची ओळख आहे. 'मैं हूं ना'नंतर 'ओम शांति ओम', 'तीस मार खां' आणि 'हॅप्पी न्यू इअर'सारख्या अनेक सिनेमांचे दिग्दर्शन तिने केले आहे.   


फराह 2014 मध्ये शिरीष कुंदरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. शिरीष आणि फराहची लव्हस्टोरी कोणत्या सिनेमांपेक्षा कमी फिल्मी नाही. शिरीषने इलेक्ट्रॉनिक्समधून इंजिनिअरिंग केली आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तो मॉटरोला कंपनीत कामाला होता. या कंपनीत चार वर्ष काम केल्यानंतर त्याने बॉलिवूडकडे मोर्चा वळवला.  

शिरीष आणि फराहची ओळख पहिल्यांदा 'मै हूं ना'च्या सेटवर झाली. सेटवर दोघांची नेहमी भांडण व्हायची. त्यावेळी  हे दोघं लग्न करतील असा विचार देखील कुणी केला नव्हता. एकदिवशी अचानक शिरीषने फराहला प्रपोज केले. त्यावेळी फराह 32 वर्षांची होती तर शिरीष 25 वर्षांचा. फराहने शिरीषला होकार देण्यासाठी बऱ्याचवेळ घेतला.

शेवटी 2014मध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.लग्नाच्या चार वर्षांनंतर फराहने तिळ्यांना जन्म दिला. लग्नानंतर शिरीषने तीस मार खां आणि जोकप सारख्या सिनेमांची कथा लिहिली. मात्र हे दोनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेले. 

Web Title: Farah khan birthday know about her love story with shirish kunder