जेव्हा सुशांत आणि सारा प्रमोशन साठी गेले होते 'बिग बॉस'मध्ये, तेव्हा सलमानले विचारले होते असे अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:18 IST2020-08-10T12:14:58+5:302020-08-10T12:18:44+5:30

सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील  नेपोटिझम,  गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी  करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे.

Fans share videos of Sushant Singh Rajput's last appearance In Bigg Boss Season 12 | जेव्हा सुशांत आणि सारा प्रमोशन साठी गेले होते 'बिग बॉस'मध्ये, तेव्हा सलमानले विचारले होते असे अनेक प्रश्न

जेव्हा सुशांत आणि सारा प्रमोशन साठी गेले होते 'बिग बॉस'मध्ये, तेव्हा सलमानले विचारले होते असे अनेक प्रश्न

सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं कलाकार प्रमोशन करण्याची संधी सोडत नाहीत. आपल्या सिनेमाचे प्रमोशन घराघरात व्हावे यासाठी रिएलिटी शोचा आधार कलाकार मंडळी घेताना दिसतात. 'केदारनाथ' सिनेमाचे प्रोमशनही दणक्यात केले गेले होते. सुशांतसिंह राजपूत आणि सारा अली खान सिनेमात मुख्य भूमिकेत होते. तेव्हा सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघेही सलमान खानचा शो 'बिग बॉस'मध्ये गेले होते. 

सलमान पुढे दोघेही जुनियरच कलाकार होते. पण तरीही सलमान सोबत दोघांनी मस्त जल्लोषात प्रमोशन केले होते. सध्या बिग बॉसमध्ये सुशांत सिंहने केदारनाथ सिनेमाचे प्रमोशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वारंवार हा व्हिडीओ पाहिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून सुशांतचा दिलखुलासपणा पाहून त्याच्या आठवणीत चाहते रमताना दिसत आहेत. व्हिडीओवर कमेंटस आणि लाईक्सचा ओघ हा सुरूच आहे.

सुशांत्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या घडीला त्याच्या आठवणींव्यतिरिक्त आणखी काहीही मागे उरलेलं नाही. अशातच एक अभिनेता म्हणून ज्याप्रमाणं त्याची आठवण काढली जात आहे, तसंच परखडपणे आपली मतं मांडणारा एक दिलखुलास व्यक्ती म्हणूनही सुशांत अनेकांच्या स्मरणात आहे. याचीच प्रचिती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन येत आहे.  

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, अभिनव कश्यप, अनुभव सिंह यांच्यासह सर्वसामान्य चाहत्यांनीही ट्विटरवर करण जोहर, सलमान खान यांच्याविरोधात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली होती. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील  नेपोटिझम,  गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी  करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे. या दोघांमुळेच बॉलिवूडला आज किड लागल्याचे बोलले जाते. या दोघांवर बिहारमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसही प्रोफेशनल नेपोटिज्म आणि बॉयकाटविषयीच्या अँगलचा तपास करत आहे. सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा बोलले जाते.

Web Title: Fans share videos of Sushant Singh Rajput's last appearance In Bigg Boss Season 12