बी-टाऊनमध्ये फुलतेय आणखी एक लव्हस्टोरी, सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात ‘लेडी लव्ह’ची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:49 IST2020-01-06T11:47:25+5:302020-01-06T11:49:03+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा एकेकाळी आलिया भटसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण आलिया रणबीर कपूरची झाली आणि सिद्धार्थ एकटा पडला. अर्थात आता सिद्धार्थ एकटा नाही.

fans have started assuming that siddharth malhotra and kiara advani are dating due to their latest pics | बी-टाऊनमध्ये फुलतेय आणखी एक लव्हस्टोरी, सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात ‘लेडी लव्ह’ची एन्ट्री

बी-टाऊनमध्ये फुलतेय आणखी एक लव्हस्टोरी, सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात ‘लेडी लव्ह’ची एन्ट्री

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे नाव तारा सुतारिया हिच्यासोबतही जोडले गेले.

सिद्धार्थ मल्होत्रा एकेकाळी आलिया भटसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण आलिया रणबीर कपूरची झाली आणि सिद्धार्थ एकटा पडला. अर्थात आता सिद्धार्थ एकटा नाही. होय, सिद्धार्थच्या आयुष्यातही एका खास व्यक्तिची एन्ट्री झालीय. ती कोण तर कियारा अडवाणी. सध्या सिद्धार्थ व कियाराच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. म्हणायला कियारा व सिद्धार्थ प्रोफेशनल लाईफमध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये आहेत. एकीकडे ‘कबीर सिंग’ व ‘गुड न्यूज’ या सुपरहिट सिनेमांमुळे कियारा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. दुसरीकडे सिद्धार्थ अद्यापही स्ट्रगल करतोय. पण असे असले तरी कियारा व सिद्धार्थ एकमेकांत गुंतल्याचे मानले जातेय.

कालपरवा दोघेही मुंबई एअरपोर्टवर दिसले होते. दोघांनाही पापाराझींनी एकत्र पोज देण्याची विनंती केली. पण पापाराझींना पाहून दोघेही दोन दिशेला पळाले होते. कियाराने तर जणू ती सिद्धार्थला ओळखतच नाही, अशा थाटात पळ काढला होता. पण आता हा सगळा ड्रामा होता, याचा पुरावा समोर आला आहे.

होय, कियारा व सिद्धार्थ भलेही मुंबई विमानतळावर वेगवेगळे दिसले. पण न्यू ईअर सेलिब्रेशन मात्र दोघांनी एकत्र केले. या दोघांचे फोटो पाहून चाहत्यांनी तसा दावा केला आहे. या फोटोत कियारा व सिद्धार्थ दोघेही एकाच ठिकाणी असल्याचे सिद्ध होते. साहजिकच या फोटोंमुळे कियारा व सिद्धार्थच्या लिंक अपच्या बातम्यांना बळ मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे नाव तारा सुतारिया हिच्यासोबतही जोडले गेले. पण कियाराबद्दल सिद्धार्थ गंभीर असल्याचे दिसतेय.
तूर्तास सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. विष्णु वरधान दिग्दर्शित या चित्रपटात तो डबल रोलमध्ये दिसणार आहे. कियाराचे म्हणाल तर तिच्याकडेही मोठ्या चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. 

Web Title: fans have started assuming that siddharth malhotra and kiara advani are dating due to their latest pics