सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने सारा सारा अली खानसह केले गैरवर्तन, चाहत्याला मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:07 IST2019-11-29T13:06:36+5:302019-11-29T13:07:15+5:30

सेल्फी काढत असताना गैरवर्तणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून साराचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

Fan Got too close to Sara Ali Khan while taking a selfie | सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने सारा सारा अली खानसह केले गैरवर्तन, चाहत्याला मागावी लागली माफी

सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने सारा सारा अली खानसह केले गैरवर्तन, चाहत्याला मागावी लागली माफी

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारांसह आपलाही एक सेल्फी असावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्याच दरम्यान आपला आवडता कलाकार दिसला तर त्याच्याबरोबर एक सेल्फी क्लिक करणे हे ओघाने आलेच. मात्र कधी - कधी अतिउत्साही फॅन्स सेलिब्रेटींची डोकेदुखीही ठरतात. केवळ फोटो काढण्यासाठी  फॅन्स कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. काही अतिउत्साही फॅन्स याचा गैरवापर करत सेलिब्रिटींना कशाप्रकारे त्रास देतात हे आपण पाहिले आहे. अशाच एका फॅननं साऱ्या सीमा पार करत साराअली खानसह सेल्फी काढत असताना गैरवर्तणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून साराचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 

सारा अली खान नुकतीच न्यूयॉर्कमधून व्हेकेशन एन्जॉय करून परतत असताना एअरपोर्टवर काही फॅन्सने तिला घेरले आणि सेल्फी काढले. त्यात एकाने तिच्याकडे सेल्फी घेण्याची विनंती केली. पण सेल्फी घेताना तिला त्याने टच करण्याचा प्रयत्न केला. मात्र साराही झटकन दूर झाली आणि हसहसत सेल्फी दिला. चाहत्याला त्याची चूक उमगली आणि त्यानंतर त्याने  तिची माफीही मागितली. 

 


साराने देखील तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या केदारनाथ या पहिल्याच सिनेमाला रसिकांचे चांगलेच प्रेम मिळाले. त्यानंतर 'सिम्बा' या सिनेमातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. 'लव्ह आज कल 2' आणि 'कुली नं 1' या सिनेमांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या सिनेमांची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'लव्ह आज कल 2' मध्ये कार्तिक आर्यनसोबत तर 'कुली नं 1' मध्ये वरुण धवनसोबत तिची जोडी जमणार आहे.

Web Title: Fan Got too close to Sara Ali Khan while taking a selfie