धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:03 IST2025-11-18T10:03:08+5:302025-11-18T10:03:40+5:30
सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३४ वर्षीय लोकप्रिय गायकाचं निधन झालं आहे.

धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
सिनेइंडस्ट्रीतून एक दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३४ वर्षीय लोकप्रिय गायकाचं निधन झालं आहे. ओडिया सिंगर हुमाने सागर याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी(१७ नोव्हेंबर) हुमाने सागर याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर सिनेसृष्टीतूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
हुमाने सागर याच्या निधनाचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने सिंगर हुमाने सागरचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ नोव्हेंबर) हुमाने सागर याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही टेस्ट केल्यानंतर त्याचे अवयव निकामी झाल्याचं समोर आलं. एक्यूट ऑन क्रोनिक लिव्हर फेल्युअर, बायलेटरल न्युमोनिया, डायलेटेड कार्डियोमायोपॅथी सारख्या गंभीर आजारांचा हुमाने सागर सामना करत होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सिंगरच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. हुमाने सागर याच्या आईने सिंगरचा मॅनेजर आणि इव्हेंटच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. गायकाची तब्येत ठीक नसूनही त्याला जबरदस्ती इव्हेंटमध्ये परफॉर्म करायला लावल्याचा गंभीर आरोप हुमाने सागरच्या आईने केला आहे.