आमिर खानच्या चित्रपटात झळकण्यासाठी फातिमाने नाकारला 'हा' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2017 13:01 IST2017-06-05T07:31:08+5:302017-06-05T13:01:08+5:30

आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी फातिमा सना शेख त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तानला' घेऊन खूपच उत्साहित ...

Fame has denied the film 'Aaa' to appear in Aamir Khan's film | आमिर खानच्या चित्रपटात झळकण्यासाठी फातिमाने नाकारला 'हा' चित्रपट

आमिर खानच्या चित्रपटात झळकण्यासाठी फातिमाने नाकारला 'हा' चित्रपट

िर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी फातिमा सना शेख त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तानला' घेऊन खूपच उत्साहित आहे. फातिमाच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. दंगलने 1700 कोटीचा गल्ला जमावलाय होता. त्यामुळे आता फातिमा आपल्या करिअरला घेऊन खूपच अर्लट दिसतेय. आमिरच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये झळकण्यासाठी तिने सुशांत सिंगसोबतच्या चित्रपटाला नकार दिला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार फातिमा सुशांत सिंग राजपूतसोबत चंदा मामा दूर केमध्ये दिसणार होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट तिने ऐकली सुद्धा. स्क्रिप्ट ऐकल्यावर तिला जाणवला की, या चित्रपटाची कथा अभिनेत्याभवतीच फिरते. चित्रपटाचा पूर्ण फोकस सुशांत सिंगवर आहे. दंगलसारखे चित्रपटात काम केल्यानंतर फातिमा चित्रपटातील भूमिका खूप चोखंदळपणे निवडते. 

सूत्रांच्या माहितीनुसार फातिमाला जेव्हा चंदा मामा दूर के या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी चर्चा सुरु होती. मात्र फातिमाने आमिरच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानला प्राधान्य दिले. फातिमासह अनेक अभिनेत्री यांची नावं या भूमिकेसाठी चर्चेत होती. कॅटरिना कैफ, कृति सेनन, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर या ही स्पर्धेत होत्या. या भूमिकेसाठी फातिमाने स्क्रिन टेस्ट ही दिली.  ज्यात ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये योद्धासारखी दिसत होती. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन परदेशी रवाना झाले आहेत. 2018च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळते आहे. याचित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

Web Title: Fame has denied the film 'Aaa' to appear in Aamir Khan's film