फैसल खानने सख्खा भाऊ आमिरबरोबरचं नातं तोडलं, दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:27 IST2025-08-17T17:26:00+5:302025-08-17T17:27:30+5:30

आमिर खानचा भाऊ फैजल खान याने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Faissal Khan Cuts Ties With Aamir Khan’s Family Denies Receiving Any Support | फैसल खानने सख्खा भाऊ आमिरबरोबरचं नातं तोडलं, दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

फैसल खानने सख्खा भाऊ आमिरबरोबरचं नातं तोडलं, दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

बॉलिवूड अभिनेता फैसल खान आणि आमिर खान यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. फैसलने आमिरशी असलेले सारे संबंध तोडल्याची घोषणा केली आहे. तसेच कुटुंबावरही गंभीर आरोप केले आहेत.  त्यासोबतच, फैसलनं कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय.

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या निवेदनात  फैसल खाननं कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. आता तो त्याचे दिवंगत वडील ताहिर हुसेन आणि आई झीनत ताहिर हुसेन यांच्या कुटुंबाचा भाग राहणार नाही. ऐवढंच नाही तर फैसलनं त्यांच्या मालमत्तेवरील दावाही सोडला आहे. याशिवाय, आमिर खानकडून कोणतीही आर्थिक मदत घेणार नसल्याचं त्यानं म्हटलं.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच एका मुलाखतीमध्ये फैसलनं त्याच्या आमिर आणि त्याच्या कुटुंबावर १ वर्ष घरात कोंडून ठेवलं आणि वेडं ठरवलं, असे आरोप केले होते. दुसरीकडे, फैजलच्या या आरोपांवर आमिरच्या कुटुंबियांकडून सविस्तर स्टेटमेंट आलं होतं. यामध्ये त्यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.

फैसल खान आणि आमिर खान हे दोघेही सख्खे भाऊ आहेत, त्यांची बॉलिवूडमधील कारकीर्द पूर्णपणे वेगळी आहे.फैजलने 'कयामत से कयामत तक'मध्ये खलनायकाची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तो आमिर खानच्या ‘मेला’ सिनेमातही दिसला होता. त्याचबरोबर  त्याने त्याच्या वडिलांच्या 'तुम मेरे हो' या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. फैजलने मदहोश (१९९४) आणि चिनार दास्तान-ए-इश्क (२०१५)सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्याला यश मिळाले नाही. दुसरीकडे, आमिर खान बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी झाला आणि सुपरस्टार बनला.

Web Title: Faissal Khan Cuts Ties With Aamir Khan’s Family Denies Receiving Any Support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.