OMG! आमिरने फातिमा सना शेखसोबत गुपचूप केलं लग्न? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:38 AM2021-12-23T11:38:57+5:302021-12-23T11:43:45+5:30

Fact Check: याच वर्षी जुलै महिन्यात Aamir Khan ने दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर आमिर लवकरच फातिमासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यापूर्वी त्या दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fact Check: Aamir Khan married Fatima Sana Shaikh for the third time? | OMG! आमिरने फातिमा सना शेखसोबत गुपचूप केलं लग्न? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

OMG! आमिरने फातिमा सना शेखसोबत गुपचूप केलं लग्न? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

googlenewsNext

काय सांगता? किरण राव हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने (Aamir Khan ) अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत ( Fatima Sana Shaikh ) तिसरं लग्न केलंय? सोशल मीडियावर तरी सध्या हाच दावा को जातोय. अगदी आमिर व फातिमाच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. या फोटोत फातिमाने साडी नेसली आहे आणि तिच्या भांगेत कुंकू आहे.

याच वर्षी जुलै महिन्यात आमिरने दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर  आमिर लवकरच फातिमासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर आमिर त्याच्या तिसर्‍या लग्नाची घोषणा करणार, अशीही चर्चा होती. मात्र त्यापूर्वी आमिर व फातिमा दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 एका फेसबुक पेजवर फातिमा व आमिरचा एकत्र असा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनही आहे.

‘फातिमा शेख ही तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. आज तीच अभिनेत्री आमिर खानची तिसरी पत्नी बनली आहे. बरं ही त्याची वैयक्तिक बाब आहे, पण सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा आमिर खान त्याच्या अनेक विवाह आणि पत्नींवर काही बोलणार आहे का?’ असा प्रश्न या कॅप्शनद्वारे विचारण्यात आला आहे.

हा फोटो व्हायरल होताच आमिर खान सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. व्हायरल फोटो खरा की खोटा हे जाणून न घेता लोक आमिरला ट्रोल करत आहेत. पण मुळातच हा व्हायरल फोटो खोटा आहे. म्हणजेच, तो फोटोशॉप्ड आहे. आमिर आणि फातिमाचा व्हायरल होणारा हा फोटो आकाश अंबानी यांच्या साखरपुडादरम्यानचा आहे. मूळ फोटोत आमिर आणि किरण राव एकत्र उभे आहेत. मात्र काहींनी तो फोटो एडिट करुन त्याजागी फातिमाचा चेहरा लावला आहे. त्यावेळी आमिर खानचा किरण रावशी घटस्फोट झाला नव्हता.

 याआधी एका युट्युब चॅनलने आमिर व फातिमाने लग्न केलं असल्याचा दावा केला होता. मात्र अद्यापतरी आमिर व फातिमा यांनी अधिकृतपणे याबाबत काहीही खुलासा केला नाही. आमिरच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व अफवा आहेत.
आमिर सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Fact Check: Aamir Khan married Fatima Sana Shaikh for the third time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.