विदेशात प्रियंका, दीपिका नव्हे, तर कॅटरिना कैफ आहे सर्वांत लोकप्रिय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 20:09 IST2018-03-23T14:39:41+5:302018-03-23T20:09:41+5:30

विदेशात बॉलिवूड अभिनेत्रींच्या लोकप्रियतेविषयी सांगायचे झाल्यास लगेचच आपल्या समोर देसी गर्ल प्रियंका चोपडा आणि मस्तानी दीपिका पादुकोण हे दोन ...

External Priyanka, not Deepika, but Katrina Kaif is the most popular! | विदेशात प्रियंका, दीपिका नव्हे, तर कॅटरिना कैफ आहे सर्वांत लोकप्रिय!

विदेशात प्रियंका, दीपिका नव्हे, तर कॅटरिना कैफ आहे सर्वांत लोकप्रिय!

देशात बॉलिवूड अभिनेत्रींच्या लोकप्रियतेविषयी सांगायचे झाल्यास लगेचच आपल्या समोर देसी गर्ल प्रियंका चोपडा आणि मस्तानी दीपिका पादुकोण हे दोन समोर येतात. कारण या दोघींनीही हॉलिवूडमध्ये काम केले असून, चांगली लोकप्रियता मिळविली आहे. मात्र नुकतेच बॉलिवूडमधील विदेशात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आली असता, त्यामध्ये या दोन्ही अभिनेत्रींचे नाव नसल्याचे समोर आले आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. कारण या यादीत प्रियंका, दीपिकाचे नाव नसून, कॅटरिना कैफचे नाव असल्याचे समोर आले. त्यामुळे विदेशात सर्वाधिक लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना आहे. 

दरम्यान, हा निष्कर्ष व्हिडीओ आॅन डिमांड अ‍ॅप 'Spuul’च्या माध्यमांतून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. या सर्वेक्षणासाठी ४० मिलियन डॉलर खर्च करण्यात आले आहे. जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यानचा डाटा प्राप्त करून त्याआधारे हा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. या सर्वेक्षणात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, करिना कपूर-खान आणि काजोल यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र या सर्वांमध्ये कॅटने बाजी मारली. 



त्याचबरोबर अभिनेता दिलजित दोसांझ याला सर्वाधिक लोकप्रिय पंजाबी अभिनेता म्हणून या सर्व्हेत स्थान दिले. या व्यतिरिक्त या यादीत अभिनेत्री नीरू बजवा हिला स्थान दिले, तर तिच्यानंतर अभिनेता जिम्मी शेरगिलला स्थान देण्यात आले. कॅटबद्दल सांगायचे झाल्यास, भारतात तिची अमाप लोकप्रियता आहे. कॅटच्या अदा आजही प्रेक्षकांना घायाळ करतात. मधल्या काळात तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्याने तिच्या लोकप्रियतेत घट झाली की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु सलमान खानच्या ‘टायगर जिंदा ंहै’ने तिला पुन्हा एकदा उभारी दिली आहे. सध्या कॅट इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी होताना दिसत आहे. 

Web Title: External Priyanka, not Deepika, but Katrina Kaif is the most popular!