‘पद्मावती’चा धमाका!! जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ने घेतला धसका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:00 IST2017-09-21T06:30:41+5:302017-09-21T12:00:41+5:30

बॉलिवूडचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ जॉन अब्राहम सध्या ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यंदा ८ डिसेंबरच्या मुहूर्ताला हा ...

Explode of 'Padmavati' !! John Abraham's 'Atom' | ‘पद्मावती’चा धमाका!! जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ने घेतला धसका!!

‘पद्मावती’चा धमाका!! जॉन अब्राहमच्या ‘परमाणु’ने घेतला धसका!!

लिवूडचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ जॉन अब्राहम सध्या ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. यंदा ८ डिसेंबरच्या मुहूर्ताला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कदाचित ‘पद्मावती’च्या धमाक्यापुढे ‘परमाणु’चा धमाका जाणवणार नाही, हे जॉन व मेकर्सला वेळीच कळले. त्यामुळे सध्या एक ताजी खबर कानावर येतेयं. होय, ‘परमाणु’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट यावर्षी नाही तर पुढील वर्षी रिलीज केला जाईल.
संजय लीला भन्साळींचा बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा फर्स्ट लूक आजच रिलीज केला गेला. हा चित्रपट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे ‘परमाणु’ची रिलीज डेट पुढे ढकण्यात यावी, अशी विनंती भन्साळींनी जॉनला केली आणि जॉनने म्हणे, ही विनंती मान्य केली, असे सध्या ऐकू येत आहे. (खरे तर भन्साळींच्या विनंतीला विनंती म्हणण्याऐवजी ‘धोक्याची पूर्वसूचना’ म्हटलेले अधिक योग्य ठरेल.) ‘परमाणु’ची रिलीज डेट पुढे ढकण्यामागे भन्साळींच्या विनंतीशिवाय आणखीही एक कारण पुढे केले जात आहे. अद्यापही ‘परमाणु’च्या काही भागांचे शूटींग बाकी आहे आणि त्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही कळतेय. मेकर्स या चित्रपटाबद्दल कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येक सीन अगदी मनासारखा शूट करण्यावर दिग्दर्शक व स्वत: जॉनचा जोर आहे. पण खरे सांगायचे तर ‘परमाणु’च्या मेकर्सला ‘पद्मावती’शी पंगा नकोय, हे स्पष्ट दिसतेय.
‘पद्मावती’ दोन पोस्टर्स आज आऊट झाले. या दोन्ही पोस्टर्समध्ये दीपिका पादुकोण दिसतेय. हे पोस्टर्स रिलीज झाले आणि इंटरनेटवर जणू लोक यावर तुटून पडले. अगदी काही तासांत या पोस्टर्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावरून ‘पद्मावती’ हा यंदाचा सर्वाधिक मोठा चित्रपट ठरेल, असे वाटतेय. यात तथ्यही आहेच. हेच तथ्य समजून उमजून ‘परमाणु’च्या मेकर्सनी रिलीज डेट लांबवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचा हा निर्णय शहाणपणाचा म्हणायला हवा.
 जॉनचा ‘परमाणु: द स्टोरी आॅफ पोखरण’हा चित्रपट  पोखरण येथे भारताने केलेल्या अणू चाचण्यांवर आधारित आहे.

ALSO READ : जॉन अब्राहमला लोकांनी का दिला जिमऐवजी शाळेत जाण्याचा सल्ला?
 

Web Title: Explode of 'Padmavati' !! John Abraham's 'Atom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.