पालकत्व अनुभवताना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:41 IST2016-04-22T01:41:22+5:302016-04-22T01:41:22+5:30

बाप होणं म्हणजे नक्की काय असतं? त्याच्याकडे एक जबाबदारी वाढली म्हणून तो त्याच्याकडे पाहतो, की आपली आता वेगळी ओळख निर्माण झाली म्हणून तो आनंदून जातो? बऱ्याच वेळा बाप झालो म्हणून पुरुष खूश होतो.

Experiencing Guardianship ...! | पालकत्व अनुभवताना...!

पालकत्व अनुभवताना...!

बाप होणं म्हणजे नक्की काय असतं? त्याच्याकडे एक जबाबदारी वाढली म्हणून तो त्याच्याकडे पाहतो, की आपली आता वेगळी ओळख निर्माण झाली म्हणून तो आनंदून जातो? बऱ्याच वेळा बाप झालो म्हणून पुरुष खूश होतो. मग तो साधा माणूस असो की सेलीब्रिटी. त्याचा आनंद, उत्साह त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येतो. नुकताच बाप झालेला ख्रिस गेल, मुलींसोबत फोटो काढणारा कमल हसन किंवा आगामी ‘डीअर डॅड’ चित्रपटातून बाप-लेकाच्या नात्याची व्याख्या अधोरेखित करणारा अरविंद स्वामी हे सर्व त्याचेच प्रतीक आहेत. टी-२० मधील बापमाणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, तो ख्रिस गेल काल-परवाच बाप बनला. त्याने लगेच आपल्या देशी धाव घेत दोन आयपीएल सामन्यांतून माघार घेतली. इन्स्टाग्रामवर आपली पत्नी नताशा बेरीजला ‘आय एम आॅन माय वे, बेबी’ सांगताना तो मुलाला पाहण्यासाठी उत्सुक होता. या खास प्रसंगी कतार एअरवेजचे त्याने आभारही मानले. आपल्या मुलाच्या जन्माने ख्रिस गेल खूप आनंदात होता. हा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसला. त्याने त्याच्या मुलीचे नाव 'इ’४२ँ' ठेवल्याची चर्चा आहे.

कमल हसनने आपल्या दोन्ही मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन यांच्यासोबत पोज देऊन आपण आपल्या आयुष्यात पालकत्वाची जबाबदारी सांभाळतो आहे, त्याचप्रमाणे आपल्या मुलांसोबत खुल्यापणाने छायाचित्रे काढताना किती सहजरीत्या वावरतो आहे, हे दर्शवून दिले. श्रुती हसननेही आपल्या वडिलांसोबतचा फोटो ‘फेसबुक’ंवर शेअर करताना अवर डॅडी डीअरेस्ट असे लिहिले आहे. ‘रोजा’ं चित्रपटातून हिंदी चित्रपटात समोर आलेल्या अरविंद स्वामीने ‘डीअर डॅड’ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले. त्याचे पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित झाले. ‘अशा प्रकारचे चित्रपट सारखे निर्माण होत नसतात. मी या चित्रपटात पित्याची भूमिका करीत असल्याचे अरविंदने सांगितले. ‘डीअर डॅड’ हा चित्रपट पिता आणि त्याचा १४ वर्षीय मुलगा यांच्यातील नात्याभोवती आहे. दिल्लीहून मसुरीला आपल्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये जाताना रस्त्यात काय होते, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

Web Title: Experiencing Guardianship ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.