Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 12:04 IST2017-05-18T05:42:41+5:302017-05-18T12:04:30+5:30

मैंने प्यार किया या चित्रपटात रिमा लागू सलमानच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. ...

Exclusive: At the time of love, you will be surprised to hear that Salma Khan's mother, | Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

ंने प्यार किया या चित्रपटात रिमा लागू सलमानच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटामुळे त्यांचे करियर पूर्णपणे बदलून गेले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 
रिमा लागूंनी काही महिन्यांपूर्वी लोकमतच्या ऑफिसला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी मैंने प्यार किया या चित्रपटाच्या अनेक आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या होत्या. या चित्रपटासाठी त्यांची निवड झाल्यानंतर या चित्रपटासाठी किती पैसे घेणार असा प्रश्न त्यांना राजश्री प्रोडक्शनकडून विचारण्यात आला होता. हिंदीत किती पैसे दिले जातात याची कल्पना नसल्याने त्यांनी विचार करण्यासाठी प्रोडक्शन हाऊसकडून तब्बल एक दिवस घेतला होता असे त्यांनी सांगितले होते.
रिमा लागू यांनी आमच्याशी गप्पा मारताना सांगितले होते की, मैंने प्यार किया या चित्रपटासाठी माझी निवड झाल्यानंतर मला खूप टेन्शन आले होते. कारण या चित्रपटाच्या वेळी माझे वय जेमतेम 30-35 होते. माझ्या आणि सलमानच्या वयात सात-आठ वर्षांचेच अंतर होते. त्यामुळे मी त्याच्या आईच्या भूमिकेत शोभेल की नाही हा मला प्रश्न पडला होता. माझे वय वाढवण्यासाठी माझे केस रंगवले जाणार याची मला खात्री होती. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी तसे काहीच केले नाही. त्यांनी केवळ मला एक वेगळा पण छानसा गेटअप दिला. या चित्रपटाची कथा, संगीत, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि नायक अथवा नायिकेची आई म्हणून चित्रपटसृष्टीत माझे एक वेगळे स्थान निर्माण झाले. 

Also Read : Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?

Also Read : Exclusive : ​या मराठी अभिनेत्याच्या रिमा लागू कन्या आहेत असाच अनेकांचा समज होता

 

Web Title: Exclusive: At the time of love, you will be surprised to hear that Salma Khan's mother,