Exclusive: ....तर संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाचा ठरला असता पहिला सिनेमा, तेही वयाच्या ९व्या वर्षी
By तेजल गावडे | Updated: February 15, 2022 15:16 IST2022-02-15T15:14:31+5:302022-02-15T15:16:02+5:30
आलिया भट (Alia Bhatt) लवकरच 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटात दिसणार आहे.

Exclusive: ....तर संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाचा ठरला असता पहिला सिनेमा, तेही वयाच्या ९व्या वर्षी
अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) लवकरच संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिने मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. खरेतर या चित्रपटाआधी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत आलिया भट 'इंशाल्लाह' चित्रपटात काम करणार होती. मात्र हा चित्रपट बनण्याआधीच रखडला. तसेच संजय लीला भन्साळी 'बालिका वधू' हा चित्रपट बनवणार होते आणि या चित्रपटासाठी त्यांनी आलियाची निवड केली होती. पण हा चित्रपटदेखील बस्त्यात गेला. याबद्दल नुकताच आलिया भटने मुलाखतीत खुलासा केला.
आलिया भटने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी वयाच्या ९व्या वर्षापासून मला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आम्ही एका चित्रपटावर कामदेखील करत होतो. संजय सर त्यावेळी एक चित्रपट बनवत होते बालिका वधू. मात्र हा सिनेमा बनला नाही. हा चित्रपट बनता बनता राहिला.
आलिया पुढे म्हणाली की, त्यानंतर मी आणि संजय सर इंशाल्लाह चित्रपटासाठी भेटलो आणि हा चित्रपटदेखील बस्त्यात गेला. हा चित्रपट पण होता होता राहिला. मग माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली की, माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे का? माझ्या ग्रहांमध्ये काही अडचण आहे का? काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे.
आलिया भटने सांगितले की, संजय सरांसोबत मी जेव्हा जेव्हा काम करायला जात होते तेव्हा ते चित्रपट अडचणीत आले. अखेर सर माझ्याकडे गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची स्क्रीप्ट घेऊन आले. ते म्हणाले ही स्क्रीप्ट आहे आणि आपण एकत्र काम करत आहोत.संजय सर ठाम होते की तूच ही भूमिका करू शकते. याउलट मला शंका होती की ही भूमिका मी करू शकेन. कारण माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ही अगदी वेगळी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे त्या भूमिकेची शक्ती, सामर्थ्य आणि तीव्रता कशी दाखवू शकेन. माझ्यात मृदूता जास्त आहे. कठोरपणा कमी आहे. त्यामुळे मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन का, असा प्रश्न मला सतावत होता. पण सरांचे माझ्याबाबतीतील मत ठाम होते. त्यामुळे माझ्या शंकेला जागाच नव्हती. खरेतर मला वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करायचे होते आणि आता ही संधी चालून आली आहे. तर मला या संधीचं सोनं करायचं होते. त्यामुळे मी या भूमिकेसाठी पूर्णपणे तयार झाली.