Exclusive : कितने दूर कितने पास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:59 IST2016-06-18T05:14:35+5:302016-06-18T10:59:30+5:30

कधी काळी त्या दोघांना एकमेंकापासून दूर राहाणं पसंत नव्हतं. जिथं पाहावं तिथं दोघं एकत्र दिसायचे. एकमेकांची कंपनी दोघंही एन्जॉय ...

Exclusive: How far is so close! | Exclusive : कितने दूर कितने पास !

Exclusive : कितने दूर कितने पास !

ी काळी त्या दोघांना एकमेंकापासून दूर राहाणं पसंत नव्हतं. जिथं पाहावं तिथं दोघं एकत्र दिसायचे. एकमेकांची कंपनी दोघंही एन्जॉय करायचे. बॉलीवुडच्या पार्ट्या ते सिनेमाचं स्क्रीनिंग सगळीकडे बॉलीवुडचं कपल एकत्र पाहायला मिळायचं. हे लव्हबर्ड्स म्हणजे बॉलीवुडचा बर्फी रणबीर कपूर आणि चिकनी चमेली कॅटरिना कैफ. मात्र दोघांच्या नात्यात दुरावा काय आला आणि सगळं चित्रच पालटलंय. एकमेकांच्या हातात हात घालून वावरणारे हे लव्हबर्ड्स आता एकमेकांपासून नजरा लपवतायत. याचीच प्रचिती 'उडता पंजाब' या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी आली. दोघांनी एकाच ठिकाणी सिनेमा पाहणंही टाळलं. कॅटनं लाइट बॉक्स इथं आलिया आणि भट्ट कुटुंबीयांसह 'उडता पंजाब'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. तर तिकडे रणबीरनं जुहूच्या सनी सुपर साऊंड्स इथं जाऊन 'उडता पंजाब' पाहिला. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये करण जोहरच्या पार्टीलाही कॅटनं दांडी मारली.  तिथं रणबीर असल्यानं पार्टीला जाणं कॅटनं टाळलं. त्यामुळं बर्फी कपूर आणि चिकनी चमेली दोघांनाही एकमेंकांपासून स्पेस हवाय असंच दिसतंय. 



रणबीरनं जुहूच्या सनी सुपर साऊंड्स येथे 'उडता पंजाब' सिनेमा पाहिला. 




कॅटरिनानं लाइट बॉक्स येथे 'उडता पंजाब' सिनेमा पाहिला.

Web Title: Exclusive: How far is so close!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.