Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 12:06 IST2017-05-18T05:05:49+5:302017-05-18T12:06:42+5:30

रिमा लागू यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी चित्रपटामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकात तर खूपच कमी पैसा मिळत ...

Exclusive: Do you know how much money did I get for Rima's application for the film? | Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?

Exclusive : ​तुम्हाला माहीत आहे का मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा लागू यांना किती पैसे मिळाले होते?

मा लागू यांनी अनेक वर्षं मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी चित्रपटामध्ये ऐंशी-नव्वदच्या दशकात तर खूपच कमी पैसा मिळत असे. त्यावेळात मराठी इंडस्ट्रीमध्ये पैसाच नव्हता. कलाकाराने मला इतके पैसे मिळावेत अशी मागणी करण्याची देखील ती वेळ नव्हती. त्यामुळे निर्माता जितके पैसे देईल तितके कलाकार आनंदाने घेत असत. पण हिंदी इंडस्ट्रीत तसे नव्हते. हिंदी इंडस्ट्रीत प्रत्येक कलाकार आपल्याला किती पैसे हवे याची निर्मात्याकडे मागणी करत असे आणि त्याची ती मागणी पुरवलीदेखील जात असे.
मैंने प्यार किया हा रिमा लागू यांच्या करियरचा टर्निंग पॉईंट होता असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. रिमा लागू यांनी अनेक वर्षं मराठीत काम केले होते. मैंने प्यार किया या चित्रपटात त्यांना एक खूप चांगली भूमिका साकारायला मिळाली. मराठी नाटकातील त्यांच्या काही भूमिका पाहून त्यांना राजश्री प्रोडक्शनने मैंने प्यार किया या चित्रपटासाठी विचारले. या चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाल्यानंतर चित्रपटात काम करायला तुम्ही किती पैसे घेणार असे त्यांना निर्मात्यांकडून विचारण्यात आले. मराठी चित्रपट करताना कधीच असा प्रश्न विचारला जात नसे. त्यामुळे रिमा लागू यांना चांगलेच टेन्शन आले. पैसे किती सांगायचे हे त्यांना काहीच कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक दिवस मागितला. संपूर्ण दिवस पैसे किती मागायचे याचाच त्या विचार करत होत्या. आपण जास्त रक्कम मागितली तर आपल्याविषयी त्यांच्या मनात काही चुकीचे ग्रह निर्माण होतील अशी भीती देखील त्यांच्या मनात होती. कोणाला याबाबत विचारायचे हे देखील त्यांना कळत नव्हते. त्यांनी रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निर्मात्यांची भेट घेऊन मला केवळ 21 हजार द्या असे त्यांना सांगितले. पण हे ऐकून चित्रपटाचे निर्माते जोरजोरात हसू लागले. कारण त्यांच्यासाठी ही खूपच कमी रक्कम होती. हिंदी इंडस्ट्रीत किती पैसे दिले जातात हे रिमा यांना माहीत नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी या चित्रपटासाठी स्वतःहून रिमा लागू यांना या रक्कमेपेक्षा कित्येक पटीने अधिक रक्कम दिली. 

Also read : Exclusive : ​या मराठी अभिनेत्याच्या रिमा लागू कन्या आहेत असाच अनेकांचा समज होता

Also read : Exclusive : मैंने प्यार कियाच्या वेळी सलमान खानच्या आईचे म्हणजेच रिमा लागू यांचे वय किती होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

 

Web Title: Exclusive: Do you know how much money did I get for Rima's application for the film?