'सब बदलेगा, समय, लोग और लोक', असं का म्हणतेय अनुष्का शर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:17 IST2020-04-21T16:16:24+5:302020-04-21T16:17:00+5:30

अनुष्का शर्मा शेवटची झिरो सिनेमात झळकली होती.

"Everything will change, time, people and people," says Anushka Sharma | 'सब बदलेगा, समय, लोग और लोक', असं का म्हणतेय अनुष्का शर्मा 

'सब बदलेगा, समय, लोग और लोक', असं का म्हणतेय अनुष्का शर्मा 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली नवीन सीरिज लवकरच अॅमेझॉन प्राइमवर दाखल होणार आहे. नुकताच अनुष्काने त्याचा टीझर सोशल मीडियावर लाँच केला आहे. या सीरिजमध्ये थ्रिलर कहाणी पहायला मिळणार आहे.

अनुष्का शर्माने टीझर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, सब बदलेगा, समय, लोग और लोक.

टीझरची सुरूवाच एका इंटरेस्टिंग आवाजाने होते जी दहशत निर्माण करतो. प्रेक्षकांना एका अशा घटनेसाठी उलट गिनती करायला सांगतो जी लवकरच दाखल होणार आहे.

अनुष्का शर्माची निर्मिती असलेला हा टीझर भलेही दाखल झाला असला तरी अद्याप या वेबसीरिजच्या शीर्षकाचा खुलासा केलेला नाही.

अनुष्का व विराट कोहली दोघेही सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. यादरम्यानचे अनेक फोटो दोघांनी शेअर केले आहेत.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो चित्रपटात पहायला मिळाली. यात तिच्यासोबत शाहरूख खान व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

Web Title: "Everything will change, time, people and people," says Anushka Sharma