लॉकडाऊनमध्येही या अभिनेत्रीने उडवलीय सा-यांची झोप, सोशल मीडियावर घालतेय धुमाकुळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 09:36 IST2020-06-13T09:31:19+5:302020-06-13T09:36:17+5:30
मौनीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमध्येही या अभिनेत्रीने उडवलीय सा-यांची झोप, सोशल मीडियावर घालतेय धुमाकुळ
छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. तिनं अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.मौनी रॉय तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता. हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते.मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.त्यानंतर आता नुकत्याच शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोमुळे मौनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मौनीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
तसेच एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी अबु धाबीला गेली होती. कोरोना व्हायरस झालेल्या लॉकडाऊनमुळे गेले 2 महिने ती तिथेच अडकून होती. एका मुलाखती दरम्यान मौनी म्हणाली, फोटोशूट संपल्यानंतर मी एक-दोन आठवडे आणखी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.
कारण पुढचा प्रोजेक्ट 15 एप्रिलला सुरु होणार होता. मात्र मला याची अजिबात कल्पना नव्हती की जगभरात लॉकडाऊन घोषित करण्यात येईल आणि मी इथेच अडकून पडेन.