Lockdown मध्येही 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या साखरपुड्याला सेलिब्रेटींची उपस्थिती, 'या' फोटोने केली पोल-खोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:36 IST2020-05-22T15:34:34+5:302020-05-22T15:36:07+5:30
आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी लॉकडाऊन असूनही या दोघांनी सोहळ्यात हजेरी लावली होती. सध्या या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

Lockdown मध्येही 'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या साखरपुड्याला सेलिब्रेटींची उपस्थिती, 'या' फोटोने केली पोल-खोल
सध्या STAY HOME, STAY SAFE असे सांगून सांगून घशाला कोरड पडत चालली आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभ आणि साखपुड्याच्या कार्यक्रम मात्र जोरात सुरू आहेत. सर्वसामा्न्यांपासून अनेकांनी छोटे खानी अगदी मोजक्याच पाहुणे मंडळींमध्ये समारोह उरकल्याचे आपण पाहिले. यातून नवरी व नवऱ्याला कोरोना झाल्याचेही प्रकार समोर आले आहे. विशेष म्हणजे काहीं सेलिब्रेटींनी सामाजित भान जपत त्यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. नियोजित तारखा कॅन्सल करत सर्वकाही सुरळीत होईल तेव्हा, आनंदाने लग्न करू असे विचार करत सेलिब्रेटींनी यंदा कर्तव्य नसल्याचे म्हटले.
दुसरीकडे नुकतेच सर्वांचा लाडका अभिनेता बाहुबली फेम राणा डग्गुबतीचा साखरपुडा पार पडला. अगदी मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असला तरीही लॉकडाऊनमध्येही काही मित्र परिवाराने या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
And it’s official!! 💥💥💥💥 pic.twitter.com/0J3jBeEaep
— Rana Daggubati (@RanaDaggubati) May 21, 2020
समांथा-नागा चैतन्य हे राणाचे खूप चांगले मित्र आहेत. आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी लॉकडाऊन असूनही या दोघांनी सोहळ्यात हजेरी लावली होती. सध्या या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज 20 मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत. राणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन 'And it’s official!!', असे ट्विट केले होते. तर मिहिकानेही इंस्टाग्रामवर या खास दिवसाचे फोटो शेअर करुन 'My happy place!', हे कॅप्शन दिले आहे.