Shocking सना खानही नाही तर मग गुरमित देबिनाच्या नात्यातील ‘ती’ वजह आहे तरी कोण ?जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 15:24 IST2016-11-28T10:23:03+5:302016-12-05T15:24:20+5:30

छोट्या पडद्यावर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेमुळे रसिकांचा फेव्हरेट बनलेला गुरमित चौधरी याचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 'वजह तुम ...

Even if the Shocking Sana Khan is not Shocking, then who is the reason for Gurmita Debi's relationship? | Shocking सना खानही नाही तर मग गुरमित देबिनाच्या नात्यातील ‘ती’ वजह आहे तरी कोण ?जाणून घ्या

Shocking सना खानही नाही तर मग गुरमित देबिनाच्या नात्यातील ‘ती’ वजह आहे तरी कोण ?जाणून घ्या


/>छोट्या पडद्यावर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेमुळे रसिकांचा फेव्हरेट बनलेला गुरमित चौधरी याचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. 'वजह तुम हो' या सिनेमातून रसिकांना गुरमितचे दर्शन घडणार आहे. गुरमित आणि सना खान यांच्यातील बोल्ड आणि इंटिमेट सीन्समुळे या सिनेमाची बरीच चर्चा होत आहे. याचनिमित्ताने गुरमितशी साधलेला हा दिलखुलास संवाद.
  
‘वजह तुम हो’ हा एक बोल्ड सिनेमा आहे. या सिनेमाबाबत कुटुंबीयांना सांगितले त्यावेळी त्यांची काय प्रतिक्रिया होती. खासकरुन देबिनाची काय प्रतिक्रिया होती ?
 
बोल्ड दृष्य केल्याने माझी पत्नी देबिनाला काही फरक पडत नाही. देबिना एक शांत महिला असून आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. या सगळ्या गोष्टींचा आमच्या नात्यावर परिणाम होत नाही. एकत्र मिळून आम्ही सिनेमाची स्क्रीप्ट निवडतो. बोल्ड आणि इंटिमेट सीन हे या सिनेमाच्या कथेचा भाग होता. त्यामुळे देबिनाने याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. सिनेमा थ्रिलर असून त्याची कथा देबिनाला माहिती होती. सना खान आणि माझ्यावर चित्रीत करण्यात आलेल्या इंटिमेट सीन्सची देबिनाला पूर्ण कल्पना होती. तिला माहिती होते की आमच्या दोघांवर चित्रीत होणार सीन हा सिनेमातील आहे आणि तो कथेचा भाग आहे. वजह तुम हो सिनेमाची कथा मला आणि देबिनाला आवडली. सिनेमाची कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मी स्तब्ध झालो. सिनेमातील बोल्ड सीनमुळे नाही तर यातील विविध पात्रांमुळे हा सिनेमा मी स्वीकारला. त्यामुळे मी इंटिमेट सीन करुनही देबिना नाराज का झाली नाही असा प्रश्नही अनेकांना पडेल.
 
बोल्ड आणि इंटिमेट सीन करणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होते ?
 
बोल्ड आणि इंटिमेट सीन्स करताना ती स्वतः तयार नसतो. मला ते थोडे अवघडल्यासारखे वाटते. त्यात मी लाजतोही. मी इतका लाजतो की देबिनाला आय लव्ह यूसुद्धा नीट बोलू शकत नाही. प्रेम व्यक्त करणेही मला कठीण जाते. खरे सांगायचे तर अशा सीन्सना मी घाबरतो. मात्र एका गोष्टीची खबरदारी घेतो की माझी ही भीती पडद्यावर दिसणार नाही.  
 
सना ने इंटिमेट सीन करण्यासाठी कशाप्रकारे सपोर्ट केला ?
 
किसिंग सीन किंवा बोल्ड सीन करण्याआधी सना बरीच नर्व्हस होती. तिच्या हातात असते तर किसिंग सीनवेळी तिने सगळ्यांना सेटवरुन बाहेर पाठवून फक्त कॅमेरा चालू करुन तो सीन दिला असता. मात्र तुमचा सहकलाकार तुम्हाला एखादा सीन करण्यासाठी सपोर्ट आणि कम्पफर्टेबल करतो. त्यामुळे तो सीन चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आमच्या दोघांवर चित्रीत करण्यात आलेले इंटिमेट सीन्ससुद्धा चटकन शूट झाले. एका टेकमध्ये हे सगळे सीन्स ओके झाले. दिग्दर्शकानेही मोठ्या खुबीने ते सिनेमात दाखवले आहेत.
 
देबिना जेव्हा नाराज होते तेव्हा तिची समजूत कशाप्रकारे काढतो ? विशेष म्हणजे बोल्ड सीन्स जेव्हा तिने पाहिले तेव्हा देबिनाने काय केले ?
 
जेव्हा ती नाराज होते तेव्हा ती मला मारते आणि याआधीसुद्धा तिने मला मारले आहे. तरी तिला माहिती होते की सिनेमात अशाप्रकारचे सीन्स आहेत. तरीही जेव्हा ते सीन देबिनाने पाहिले तेव्हा तिने आधीतर मला टपली मारली, नंतर जोरात एक चिमटा घेत माझा हात तिने पिरगळला. तिची समजूत काढण्यासाठी मी तिला मग माझे एटीएम कार्ड देतो आणि बोलतो ‘जा देबिना जा... जी ले अपनी जिंदगी..’त्यानंतर मी तिला थोडा जास्त वेळ देतो. खरे तर आम्ही आधी चांगले मित्र आहोत. एकमेंकांना आम्ही चांगले ओळखतो. मात्र आमच्यात वाद आणि भांडणेही होऊ शकतात. कारण सोशल मीडियामुळे आम्ही फॅन्सच्या खूप जवळ आलो आहोत. स्टार्सबद्दल फॅन्सना सगळ्या बारीकसारीक गोष्टी कळत असल्या तरी आम्हीही माणूस आहोत हेही त्यांना माहित आहे. माध्यमांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकते. याला कुणीही काहीच करु शकत नाही.
 
देबिना ज्यापद्धतीने तुला पाठिंबा देतेय. जर तिने असे सीन्स केले तर तुझा तिला तितकाच पाठिंबा असेल का ?
 
हो नक्कीच माझा देबिनाला पूर्ण पाठिंबा असेल. तीसुद्धा एक कलाकार आहे. सिनेमाची कथा तशी असेल आणि कथेची मागणी तसे सीन्स असतील तर माझी बिल्कुल हरकत असणार नाही. मी त्याबाबत नाराज होणार नाही किंवा त्याबद्दल ईर्षाही वाटणार नाही. ज्यारितीने ती मला समजून घेते आणि माझ्या पाठिशी ठामपणे उभी आहे. मीसुद्धा तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल. ही माझी जबाबदारी असेल.
 
टीव्ही प्रोजेक्टबाबत तुझं काही खास प्लानिंग ?

 
सध्या मी माझी सारी ऊर्जा आणि सगळी मेहनत बॉलीवुडवर केंद्रीत करतोय. छोट्या पडद्यावर प्रभू रामाची भूमिका साकारण्याची संधी लाभली त्यामुळे मी स्वतःला नशिबवान समजतो. आज मी जो काही आहे, जे काही मला यश मिळाले आहे ते या रामाच्या भूमिकेमुळेच मिळाले आहे. रसिकांना माझी भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे याचा मलाही आनंद आहे. मी सगळ्यात मोठा पौराणिक भूमिका साकारली होती हेसुद्धा मी जाणतो. मात्र पुन्हा एकदा मला एखाद्या पौराणिक भूमिकेत स्वीकारणे रसिकांनाही कठीण जाईल असे मला वाटते. बालपणापासूनच माझ्या कुटुंबीयांनी माझ्यातील अभिनय गुणांना वाव दिला. त्यामुळे लहानपणापासूनच मी स्वतःला अभिनेता समजू लागलो. टीव्ही या माध्यमाने मला सारे काही दिले आहे. त्यामुळे टीव्हीपासून मी दूर होणे शक्य नाही. मात्र सिनेमा करत असताना मालिका करणार नाही. मात्र रियालिटी शो जरुर करेन.    
 
तुझं पहिले क्रश कोण होते ?
 
लहान असताना प्रत्येक मुलीवर माझे प्रेम जडायचे. प्रत्येक मुलगी मला आवडायची. खरे सांगायचे तर प्रेम या शब्दावरच माझे खूप प्रेम होते.  

Web Title: Even if the Shocking Sana Khan is not Shocking, then who is the reason for Gurmita Debi's relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.