लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 17:53 IST2020-01-02T17:46:14+5:302020-01-02T17:53:48+5:30
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने त्याच बिल्डींगमध्ये भाड्याने घर घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.

लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत
सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून रणवीर सिंग कोट्यवधी रुपये कमावतो. इतके असूनही त्याच्याकडे मात्र हक्काचं घर नव्हतं. आता रणवीरने तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. मुंबईतील प्रभादेवी इथल्या ब्ल्यू मॉन्ट टॉवर्समध्ये त्याने भाड्याने फ्लॅट घेतला आहे.
रणवीरची पत्नी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फ्लॅट याच इमारतीत आहे. या ३३ मजली इमारतीत २६ व्या मजल्यावर दीपिकाचा 4BHK फ्लॅट आहे. २०१० साली तिने तब्बल १६ कोटींना हा फ्लॅट विकत घेतला होता.
पहिल्या दोन वर्षांसाठी रणवीर तब्बल ७ लाख २५ हजार रुपये प्रति महिना भाडं देणार आहे. त्यानंतर तीसऱ्या वर्षासाठी भाड्याची किंमत वाढून ७ लाख ९७ हजार रुपये प्रति महिना भाडं तो देणार आहे. मुळात लग्नानंतर हे दोघे एकत्र राहत नसून वेगवेगळे का राहतात यामागचे कारण अद्याप समजलेलं नाही.दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने त्याच बिल्डींगमध्ये भाड्याने घर घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.
रणवीर सिंगसह रेशीमगाठीत अडकल्यानंतर आता दीपिका आता मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे.