"मला तुझा गर्व आहे", बॉबी देओलसाठी सावत्र बहीण ईशाची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 15:52 IST2024-01-27T15:52:11+5:302024-01-27T15:52:35+5:30

बॉबी देओलच्या वाढदिवसानिमित्त ईशाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

esha deol special post for bobby deol on his 55th birthday goes viral | "मला तुझा गर्व आहे", बॉबी देओलसाठी सावत्र बहीण ईशाची खास पोस्ट

"मला तुझा गर्व आहे", बॉबी देओलसाठी सावत्र बहीण ईशाची खास पोस्ट

बॉलिवूडमधील देओल कुटुंब कायमच चर्चेत असतं. धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत सनी देओल आणि बॉबी देओलप्रमाणेच ईशा देओलनेही बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी नशीब आजमावलं. या सावत्र असूनही सनी, बॉबी आणि ईशा यांच्यामधील नातं चांगलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्येही ते दिसून आलं आहे. अनेकदा ते एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. आज बॉबी देओलच्या वाढदिवसानिमित्त ईशाने खास पोस्ट शेअर केली आहे. 

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बॉबी देओलचा एक फोटो शेअर केला आहे. "भाई, हॅपी बर्थडे! मला तुझा गर्व आहे", असं ईशाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या स्टोरीला तिने अॅनिमलमधील जमाल कुडू हे बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणंही टाकलं आहे.  सावत्र भावाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

बॉलिवूडचा बॉबी आज त्याचा ५५वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या बॉबीने ९०च्या दशकातील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. पण, हवं तसं यश त्याला मिळालं नाही. आश्रम या वेब सीरिजमधून बॉबीने कमबॅक केलं होतं. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुकही झालं आहे. आता बॉबी पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: esha deol special post for bobby deol on his 55th birthday goes viral