ईशा देओलचा ex पती मेघना लखानीच्या प्रेमात, भरत तख्तानीची 'लेडी लव्ह' नक्की काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:49 IST2025-08-31T17:46:19+5:302025-08-31T17:49:14+5:30
मेघना लखानी कोण आहे? 'या' क्षेत्रात करते काम

ईशा देओलचा ex पती मेघना लखानीच्या प्रेमात, भरत तख्तानीची 'लेडी लव्ह' नक्की काय करते?
हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलचा (Esha Deol) गेल्या वर्षी घटस्फोट झाला. पती भरत तख्तानीपासून (Bharat Takhtani) ती वेगळी झाली. ईशा आणि भरतला दोन मुली आहेत. दोन्ही लेकी आता ईशासोबत राहत आहेत. दरम्यान घटस्फोटानंतर एकाच वर्षात भरत तख्तानीच्या आयुष्यात नव्या लेडी लव्हची एन्ट्री झाली आहे. मेघना लखानी (Meghna Lakhani) असं तिचं नाव आहे. मेघना नक्की आहे तरी कोण?
ईशा देओलचा पूर्व पती भरत तख्तानीने इनस्टाग्रामवर मेघना लखानीसोबतचा फोटो शेअर करत 'माझ्या कुटुंबात स्वागत आहे' असे लिहिले. यावरुन दोघांनी रिलेशनशिप कन्फर्म केली आहे. लवकरच दोघं लग्नही करतील अशी चर्चा आहे. भरतच्या आयुष्यात एन्ट्री घेणारी मेघना लखानी कोण आहे आणि ती काय करते याची उत्सुकता अनेकांना आहे.
मेघना लखानीचं पूर्ण नाव मेघना लखानी तलरेजा आहे. तिचा जन्म स्पेन येथे झाला. ती कॉर्पोरेट दुनियेतली आहे. तिने लंडन स्कूल ऑफ आर्ट्स अँड प्रमोशनमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं. अनेक स्टार्टअपची ती फाऊंडर आहे. एविएशन इंडस्ट्रीतून तिने करिअरला सुरुवात केली. जेट एअरवेजमध्ये तिने पहिली नोकरी केली. यानंतर ती एमीरेट्स एअरवेजमध्ये जॉईन झाली. पुढे ती वीएफए ग्लोबलमध्ये कामाला लागली. तिथे ती बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये जनरल मॅनेजर पदावर होती. दुबईत राहणारी मेघना लखानी एक बिझनेसवुमन आणि वन मॉडर्न वर्ल्ड ची फाऊंडर आहे. १५ वर्षांपासून ती ग्लोबल इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत आहे.