बॉलिवूडमध्ये झळकण्यापूर्वीच 'ही' स्टार किड सोशल मीडियावर बनली Hottest Sexy symbol
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 15:14 IST2019-10-22T15:02:28+5:302019-10-22T15:14:16+5:30
नेहमीच सुहानाच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडमध्ये झळकण्यापूर्वीच 'ही' स्टार किड सोशल मीडियावर बनली Hottest Sexy symbol
बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. त्यापाठोठ आता स्टार किडमध्ये सुहाना खान सतत अॅक्टीव्ह असते. बघावं तेव्हा तिचे नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच तिने चेहरा झाकलेला एक फोटो शेअर केला आहे. .या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. तर काही युजर्स तिच्या फोटोवर संमिश्र प्रतिक्रीया देत आहे. शाहरूखच्या मुलीचे असे फोटो सोशल मीडियावर पाहणे लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.
या फोटोला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटोंमुळेच तिचे लाखांत फॉलोव्हर्स आहेत. विशेष म्हणजे सुहानाच्या बॉलिवूड डेब्युची सारेच आतुरतेने वाट पाहात असले तरीही सोशल मीडियावर तिची लोकप्रियता अधिक आहे. नेहमीच सुहानाच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे तिची एक वेगळी स्टाइल आहे.तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.