​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 15:35 IST2018-02-06T10:04:58+5:302018-02-06T15:35:43+5:30

श्रीदेवीची स्टायलिश लेक जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचे प्रेम सध्या अगदी ओसंडून वाहतेय. होय, ...

Enjoying the streets of Mumbai, the 'Shocked' coupled with fun! Look, photos! | ​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो!

​मुंबईच्या रस्त्यावर मस्ती-मजा करताना दिसले ‘धडक’ कपल! पाहा, फोटो!

रीदेवीची स्टायलिश लेक जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचे प्रेम सध्या अगदी ओसंडून वाहतेय. होय, दोघेही अगदी बिनधास्त हिंडता फिरताना दिसत आहेत. सोमवारी रात्रीही ईशान आणि जान्हवीचा एक वेगळाच अंदाज बघायला मिळाला. मुंबईच्या रस्त्यांवर या दोघांनही धम्माल मस्ती केली. त्यांच्या धम्माल मस्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.



वांद्रयाच्या एका रेस्टॉरंटमध्ये ईशान व जान्हवी डिनर डेटवर आले होते. यावेळी दोघेही मस्ती मूडमध्ये होते. इतके की मीडियासोबतही त्यांनी गंमत जंमत केली. मीडियाला पाहून ईशान व जान्हवी दोघेही हसत सुटलेत. जान्हवी तर खळखळून हसताना दिसली.  





ALSO READ : ‘बियॉन्ड द क्लाऊड’चा ट्रेलर आला! पाहा, शाहिदचा भाऊ ईशान खट्टरचा रफ अ‍ॅण्ड टफ अवतार!!

ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘धडक’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्यापूर्वी  जान्हवी आणि ईशान या दोघांच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्याही चर्चेत आहेत.  अलीकडचा  ताजा किस्साही गाजतो आहे.  खरे तर‘धडक’ सुरु होण्याआधीपासून जान्हवी व ईशान या दोघांच्या लव्ह अफेअरची चर्चा आहे. दोघेही अनेकदा  मुव्ही, लंच व डिनर डेटवर एकत्र दिसले आहेत. पण आता ‘धडक’च्या सेटवर जान्हवी व ईशान   दोघेही आणखीच जवळ आले आहेत. अलीकडे  ‘धडक’च्या शूटींगदरम्यान ईशान व जान्हवीला म्हणे कारमध्ये इंटिमेट होतांना पाहिले गेले. दोघेही सुमारे अडीच तास कारमध्ये होते. इकडे हे लव्हबर्ड्स प्रेमात बुडाले होते आणि तिकडे सेटवरचे अख्खे युनिट त्यांच्यासाठी ताटकळत बसले होते. उण्यापुºया अडीच तासानंतर दोघेही कारबाहेर आलेत आणि यानंतर कुठे अर्ध्या रात्री शूटींग सुुरू झाले. पहाटे पाचपर्यंत शूटींग सुरू होते. मुंबई फिल्म सिटीमध्ये सुरु असलेल्या शूटींगदरम्यानची ही घटना आहे. या घटनेची सध्या बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. आई श्रीदेवी हिने खरे तर जान्हवीला ईशानपासून दूर राहण्याची ताकीद दिली आहे. पण कदाचित जान्हवीवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. ती ईशानसोबत फिरण्यात मस्त आहे.

Web Title: Enjoying the streets of Mumbai, the 'Shocked' coupled with fun! Look, photos!