Official Teaser : पाहा, इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 14:13 IST2018-11-16T14:12:07+5:302018-11-16T14:13:32+5:30
इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला.

Official Teaser : पाहा, इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर!
गेल्या काही वर्षांत बॉलिवूड चित्रपटात नव-नवे प्रयोग होताना दिसत आहेत. हेच कारण आहे की, नव्या विषयाला वाहिलेले हे चित्रपट अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत आहेत. अलीकडचा ‘बधाई हो’, ‘अंदाधूंद’, गतवर्षी आलेला ‘हिंदी मीडियम’ ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे.
गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे. होय, इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला. ‘ऊपरवाला दुआ कबुल करता है, मैं सिर्फ कॅश लेता हूं,’ या इमरानच्या संवादाने टीजरची सुरुवात होते. त्याच्या या डायलॉगवरून देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे वास्तव आपण समजू शकतो. इमरानने या चित्रपटात डोनेशन घेऊन मुलांचे अॅडमिशन करून देणाºया राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे.
चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीशिवाय श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सौमिक सेन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. याच तारखेला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका द क्वीन आॅफ झांसी’ रिलीज होतोय. शिवाय हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ही याचवेळी बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. आता या दोन चित्रपटांना ‘चीट इंडिया’ कशी मात देतो, ते बघूच.