अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता इमरान हाश्मी, कधीच करत नव्हता 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:19 AM2024-02-29T11:19:21+5:302024-02-29T11:21:30+5:30

अभिनेत्यानं सांगितलं की तो एका गोष्टीसाठी खूप अंधश्रद्धाळू होता.

Emraan Hashmi says he was superstitious about numbers 8 and 13 | अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता इमरान हाश्मी, कधीच करत नव्हता 'ही' गोष्ट

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता इमरान हाश्मी, कधीच करत नव्हता 'ही' गोष्ट

अभिनेता इमरान हाश्मीनं आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी इमरान एक आहे. अनेक मोठे चित्रपट त्यानं केले आहेत. सध्या तो 'शोटाइम' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. वेबसीरिजचं प्रमोशन करण्यासाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. यातच इमरानने एक गुपित उघड केलं आहे. अभिनेत्यानं सांगितलं की तो एका गोष्टीसाठी खूप अंधश्रद्धाळू होता.

इमरान हाश्मी आणि श्रिया सरन यांनी नुकतेच  'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये श्रिया सरन हिने इमरान हाश्मी  8 आणि 13 क्रमांकाबाबत अंधश्रद्धाळू होता असं सांगितलं. आवारापन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याला 8 आणि 13 क्रमांकाबाबत विशेष सूचना द्यायचा, असं श्रियानं सांगितलं.

इमरान म्हणाला, '8 आणि 13 या दोन आकड्यांबद्दलचा माझा दृष्टीकोन OCD सारखा झाला होता. कारण मी हे आकडे  कोणत्याही परिस्थितीत टाळण्याचा प्रयत्न केला. शुटिंगसाठी जेव्हा बाहेर जावं लागायचं तेव्हा  दिग्दर्शक आणि निर्मात्यांना 8 किंवा 13 नंबर असलेल्या खोल्या बूक न करण्यास सांगायचो. या दोन खास तारखांना माझ्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडल्याचं लक्षात आल्यानंतर याबद्दलची माझी मतं कालांतराने बदलली'.


इम्रान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, टायगर-३ चित्रपटात इम्रान हाश्मी हा सलमानला टक्कर देताना दिसला. त्याने आयएसआय एजंट आतिश फतेह कादरीची भूमिका साकारली होती. तसेच तो ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता. आता लवकर तो 'शोटाईम' ही वेबसीरिज घेऊन येत आहे. 'शोटाईम' ही डिस्ने प्लस हॉटस्टार वर 8 मार्च 2024 रोजी रिलीज होत आहे.

Web Title: Emraan Hashmi says he was superstitious about numbers 8 and 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.