पाकिस्तानी इम्रान हाश्मीच्या प्रेमात; 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये झाली होती गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:01 PM2023-10-27T18:01:49+5:302023-10-27T18:07:13+5:30

इम्रान हाश्मीचा चित्रपट पाहण्यासाठी पाकिस्तानात चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.

emraan hashmi jannat movie created ruckus in pakistan | पाकिस्तानी इम्रान हाश्मीच्या प्रेमात; 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये झाली होती गर्दी

पाकिस्तानी इम्रान हाश्मीच्या प्रेमात; 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये झाली होती गर्दी

 बॉलिवूडमध्ये ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता इम्रान हाश्मीने त्याची आज वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमधील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले आहे.  त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्यात मुलींची संख्या आजही सर्वाधिक आहे. देशातच नाही तर विदेशातही इम्रानचे चाहते आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण पाकिस्तान इम्रानची क्रेझ पाहायला मिळाली होती. त्याचा एक चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली. 

2008 मध्ये 'जन्नत' हा सिनेमा रिलीज झाला होता, जो सुपरहिट ठरला. इमरान हाश्मी आणि अभिनेत्री सोनल चौहान या दोघांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली होती. पाकिस्तानमध्येही 'जन्नत' प्रदर्शित झाला होता. 

पाकिस्तानातील लाहोरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा इम्रानचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या चित्रपटाला रिलीज होऊन बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण  या चित्रपटाच्या प्रपोजल सीनचा आजही वेगळा चाहतावर्ग आहे. 

इम्रानने बॉलिवूडमध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून प्रवेश केला. मात्र, हा चित्रपट काही विशेष कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटानंतर  इम्रान 'मर्डर' या चित्रपटात पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात दोघांनी अनेक किसिंग सीन दिले होते, त्यानंतर या  इम्रानला सीरियल किसरचा टॅग देण्यात आला होता. 

बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली होती. 'मर्डर'नंतर इम्रानने 'जेहर', 'आशिक बनाया आपने', 'अक्सर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' आणि 'गँगस्टर' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.  इम्रानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इमरान खलनायकाच्या भूमिकेत असून सलमानला टक्कर देताना दिसणार आहे. 

Web Title: emraan hashmi jannat movie created ruckus in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.