मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:19 IST2025-11-10T12:18:53+5:302025-11-10T12:19:36+5:30
नुकताच दोघांचा हिंदी सिनेमा रिलीज झाला आहे.

मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
मुंबई असो किंवा अन्य कोणतंही शहर, वाहतुक कोंडीची समस्या प्रचंड वाढली आहे. अनेक लोक लोकल, मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. नुकतंच मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर दोन सेलिब्रिटी चक्क लोकलची वाट पाहत उभे होते. दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावल्याने कोणी त्यांना ओळखू शकलं नाही. मात्र एका चाहतीने त्यांचा व्हिडीओ काढला जो आता व्हायरल होत आहे. कोण आहेत हे सेलिब्रिटी?
व्हाईट टीशर्ट, ब्लॅक पँट आणि चेहऱ्यावर मास्क असलेला हा अभिनेता आहे सर्वांचा लडका इम्रान हाश्मी. तर त्याच्यासोबत जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये यामी गौतम उभी आहे. दोघांचा 'हक' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघंही चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांना सरप्राईज देत आहेत. नालासोपाराजवळ असलेल्या कॅपिटल मॉल येथेही दोघांनी हक सिनेमा सुरु असताना चाहत्यांना सरप्राईज दिलं. नंतर त्यांनी वाहतुक कोंडीत अडकायला नको म्हणून लोकलचा मार्ग निवडला. नालासोपारा स्थानकावर दोघंही लोकल वाट बघत उभे आहेत. सोबत त्यांची टीमही आहे. एका चाहतीने विरुद्ध प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडीओ काढला आहे जो आता व्हायरल होतोय.
यामी गौतमने नंतर इन्स्टाग्रामवर लोकल मध्ये बसलेला फोटोही शेअर केला होता. यासोबत तिने लिहिले, ' पहिल्यांदाच लोकलने मुंबई दर्शन, सोबत एकमेव... हक से'
'हक' सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. शाहबानो केसवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.