इमरान हाश्मी अन् मौनी रॉय स्टारर 'शोटाईम' पुन्हा एकदा हॉटस्टारवर धडकणार, जाणून घ्या Details

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:23 PM2024-06-21T16:23:14+5:302024-06-21T16:24:23+5:30

 ८ मार्च २०२४ रोजी या सीरिजचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता.

Emraan Hashmi and Mouni Roy starrer Showtime is set to air on July 12 on Disney+ Hotstar | इमरान हाश्मी अन् मौनी रॉय स्टारर 'शोटाईम' पुन्हा एकदा हॉटस्टारवर धडकणार, जाणून घ्या Details

इमरान हाश्मी अन् मौनी रॉय स्टारर 'शोटाईम' पुन्हा एकदा हॉटस्टारवर धडकणार, जाणून घ्या Details

दिग्दर्शक करण जोहरच्या 'शोटाईम' (Showtime) या वेबसीरिजला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं.  या सीरिजचे काही एपिसोड प्रदर्शित होणे बाकी होते. या शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उर्वरीत एपिसोड एका मोठ्या धमाक्यासह प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, मौनी रॉय, श्रिया सरन अशी तगडी स्टारकास्ट असेलल्या या सीरिजचा Disney Plus Hotstar ने प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'खरी मजा तर आता येईल...हॉटस्टार 12 जुलैपासून 'शोटाइम'चे सर्व भाग स्ट्रीम करण्यात येणार आहेत.  ८ मार्च २०२४ रोजी या सीरिजचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता.

'शोटाइम'चे दिग्दर्शन मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी केलं आहे. त्याची कथा सुमित रॉय, लारा चांदनी आणि मिथुन गंगोपाध्याय यांनी लिहिली आहे. तर करण जोहर या मालिकेचा निर्माता आहे. सिनेइंडस्ट्रीतील काळी बाजू आणि त्यातील आतली रहस्ये 'शोटाईम' वेब सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.  विशेष म्हणजे या सीरिजमध्ये करण जोहरने नेपोटिझमवरही भाष्य केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता संपुर्ण बेवसीरिजची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Emraan Hashmi and Mouni Roy starrer Showtime is set to air on July 12 on Disney+ Hotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.