इलिना म्हणते, अक्षय इतरांपेक्षा वेगळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 16:30 IST2016-05-27T11:00:13+5:302016-05-27T16:30:13+5:30

इलिना डीक्रुझ आणि अक्षय कुमार हे रुस्तम चित्रपटात एकत्र दिसतील. यानिमित्ताने त्याचे फोटोशूटही झाले. इलिनाने अक्षयविषयी आपली मते स्पष्ट ...

Elina says, Akshay is different from others ... | इलिना म्हणते, अक्षय इतरांपेक्षा वेगळा...

इलिना म्हणते, अक्षय इतरांपेक्षा वेगळा...

िना डीक्रुझ आणि अक्षय कुमार हे रुस्तम चित्रपटात एकत्र दिसतील. यानिमित्ताने त्याचे फोटोशूटही झाले. इलिनाने अक्षयविषयी आपली मते स्पष्ट शब्दात मांडली. अक्षय जरी सुपरस्टार असला तरी तो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या अभिनयापेक्षा लोक त्याच्याकडे सुपरस्टार म्हणून पाहतात. अक्षयसोबत चित्रपटातील कामाविषयी बोलताना ती म्हणाली, त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. तो सुपरस्टार आहे. मला चुकीचे समजू नका, परंतू लोक त्याच्या अभिनयाविषयी फारसे बोलत नाहीत. तिला इतके चित्रपट लगेचच कसे मिळाले याविषयी आश्चर्य वाटते. ज्यावेळी चित्रपट फ्लॉप होतो, त्यावेळी मी निराश होते, असे इलिना म्हणाली.
चित्रपटात अक्षयसोबत काम करताना दोघांचे संबंध छान होते. दोघांनी मिळून जी दृष्ये दिली आहेत, ती कमालीची आहेत. इतर अभिनेत्यांबरोबर अशी ‘केमेस्ट्री’ जुळून येत नाही, असेही ती म्हणाली. रुस्तम १२ आॅगस्टला प्रदर्शित होते आहे.

Web Title: Elina says, Akshay is different from others ...