​एकता कपूरची वाढली चिंता! मिळता मिळेना नवी ‘कमोलिका’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 14:26 IST2018-04-02T08:56:31+5:302018-04-02T14:26:31+5:30

सन २००१ मध्ये  आलेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने घराघरातील गृहिणींना जणू वेड लावले होते. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली ...

Ekta Kapoor grew concern! Gets new 'Kamolika'! | ​एकता कपूरची वाढली चिंता! मिळता मिळेना नवी ‘कमोलिका’!!

​एकता कपूरची वाढली चिंता! मिळता मिळेना नवी ‘कमोलिका’!!

२००१ मध्ये  आलेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने घराघरातील गृहिणींना जणू वेड लावले होते. छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होय, एकता कपूर ही लोकप्रीय मालिका नव्याने घेऊन येणार आहे. सध्या या मालिकेसाठी स्टारकास्टचा शोध सुरू आहे. पण यातच एक अडचण आहे. खरे तर यात लीड अ‍ॅक्टर आणि अ‍ॅक्ट्रेस कोण साकारणार, ही चिंता नाहीच. कारण एकता कपूरच्या डोळ्यांसमोर यासाठी अनेक नावे आहेत. पण या मालिकेतील एका पात्रासाठी कुणाला घ्यावे, या विचाराने एकता हैराण आहे. हे पात्र कुठले तर कमोलिकाचे. होय, कमोलिकाच्या पात्राला योग्य न्याय देऊ शकेल, असे नाव शोधून शोधून एकताच्या मेंदूचा जणू भुगा झालायं.



‘कसौटी जिंदगी की’मध्ये उर्वशी ढोलकियाने कमोलिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. उर्वशीने साकारलेली कमोलिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. इतकी की, आजही उर्वशीला लोक कमोलिका याच नावाने ओळखतात. त्यामुळे  या व्यक्तिरेखेसाठी स्टार कास्ट करणे एकतासाठी प्रचंड कठीण होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी एकताने सोशल मीडियावर याबद्दलची अडचण बोलूनही दाखवली होती. ‘कसौटी जिंदगी की’ नव्याने येणार म्हटल्यावर उर्वशीने एकताला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला उत्तर देताना एकताने ‘यू आर द बेस्ट, हाऊ द हेल विल आय गेट अनदर कमोलिका,’ असे लिहिले होते. एकताच्या या रिप्लायवर उर्वशीने केवळ स्माईल इमोजी पाठवले होते.
मध्यंतरी कमोलिकाची भूमिका ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री रेहना मल्होत्रा साकारणार अशी बातमी आली होती. पण अद्यापही रेहनाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे कमोलिकाच्या रूपात या नव्या शोमध्ये कुणाची वर्णी लागते आणि ही नवी अभिनेत्री कमोलिकाच्या व्यक्तिरेखेला किती न्याय देते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

ALSO READ : एकता कपूरला सगळे काही म्हणा, पण ‘ना’ म्हणू नका!

Web Title: Ekta Kapoor grew concern! Gets new 'Kamolika'!