‘वजह तुम हो’ साठी रजनीशनी घेतली आठ इंजेक्शन्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:43 IST2016-11-23T13:43:52+5:302016-11-23T13:43:52+5:30

सीन शूट करताना सेटवर अनेक गमतीजमती घडतात. एखाद्या सीनमध्ये नायकाला नायिकेकडून खुप वेळेस चपराक सहन करावी लागते. तर कधी ...

Eight injections for Rajaniashni for 'Rea Hoon Ho'? | ‘वजह तुम हो’ साठी रजनीशनी घेतली आठ इंजेक्शन्स?

‘वजह तुम हो’ साठी रजनीशनी घेतली आठ इंजेक्शन्स?

न शूट करताना सेटवर अनेक गमतीजमती घडतात. एखाद्या सीनमध्ये नायकाला नायिकेकडून खुप वेळेस चपराक सहन करावी लागते. तर कधी नायिकेला नायकाकडून एकच डायलॉग पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. थोडक्यात काय तर, दिग्दर्शकाचं समाधान झाल्याशिवाय तो सीन पुढे जाऊच शकत नाही.

आता हेच पाहा ना, विशाल पांड्या यांच्या ‘वजह तुम हो’ मधील एका सीनसाठी नायक रजनीश दुग्गलला चक्क आठ इंजेक्शन घ्यावे लागले. तुम्ही म्हणाल असं का झालं? तर झालं असं की, एक सीन असा होता ज्यात रजनीशला इंजेक्शन लावून घ्यायचं होतं. त्यासाठी दिग्दर्शक डमी इंजेक्शन देण्यास तयार होता. मात्र, रजनीशनेच आग्रह केला की, तो खरे इंजेक्शन घ्यायला तयार आहे. आता अडचण ही झाली की, सेटवर मग नर्स बोलवण्यात आली आणि तिला अभिनय जमत नव्हता. तिला अभिनय जमेपर्यंत रजनीशला मात्र आठ इंजेक्शन सहन करावे लागले. 

अभिनेता रजनीश दुग्गल या चित्रपटात एका टीव्ही नेटवर्कच्या मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका खुनाचा तो साक्षीदार होतो आणि कथेला वळण मिळते, अशा आशयाचे त्याचे कथानक आहे. 
 

Web Title: Eight injections for Rajaniashni for 'Rea Hoon Ho'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.