द्वेनेनी केली सलमानची ‘कॉपी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:30 IST2016-10-13T10:38:20+5:302016-10-17T12:30:58+5:30

‘मुझसे शादी करोगी’मधील सलमानचा ‘टॉवेल डान्स’ आठवतोयं? या डान्सस्टेपने आता खेळाडूंनाही वेड लावलेय. अलीकडे एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये वेस्ट ...

Dwivedi 'copy' of Salman Khan! | द्वेनेनी केली सलमानची ‘कॉपी’!

द्वेनेनी केली सलमानची ‘कॉपी’!

ुझसे शादी करोगी’मधील सलमानचा ‘टॉवेल डान्स’ आठवतोयं? या डान्सस्टेपने आता खेळाडूंनाही वेड लावलेय. अलीकडे एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटर द्वेने ब्रॅव्होने हजेरी लावली. आता डान्स रिअ‍ॅलिटी शो म्हटल्यावर ब्रॅव्होचे स्टेजवर थिरकणे आलेच. यावेळी ब्रेव्होने सलमानच्या चित्रपटांमधील काही गाण्यांवर परफॉर्मन्स केला.

सलमानच्या ‘मुझसे शादी करोगी’मधील ‘टॉवेल डान्स’वरही ब्रॅव्हो थिरकला. मग काय, ब्रॅव्होची ही डान्सस्टेप पाहून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा  एकच कडकडाट केला.‘तिन्हीही खान हे बॉलिवूडचे खरे स्टार्स आहेत. मी त्या तिघांचाही चाहता आहे.

मात्र ‘भाई’चा अंदाज काही औरच आहे. त्याच्या डान्स स्टाईलचा मी अक्षरश: ‘दिवाना’ आहे. त्याच्या गाण्यांवर परफॉर्मन्स करण्यासाठी मी काहीही करू शकतो,’ असे ब्रॅव्हो यावेळी म्हणाला.

Web Title: Dwivedi 'copy' of Salman Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.