'स्त्री'च्या शूटिंगदरम्यान राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला करावा लागला 'या' विचित्र गोष्टींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 10:11 IST2018-08-06T10:07:51+5:302018-08-06T10:11:49+5:30

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' ट्रेलर रिलीज झालेल्यानंतर यासिनेमाला घेऊन अनेक चर्चा होतायेत. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्याची टॅग लाईन 'मर्द को दर्द होगा' अशी आहे.

During Stree movie shooting Rajkumar Rao and Shraddha Kapoor had to deal with these strange things | 'स्त्री'च्या शूटिंगदरम्यान राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला करावा लागला 'या' विचित्र गोष्टींचा सामना

'स्त्री'च्या शूटिंगदरम्यान राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरला करावा लागला 'या' विचित्र गोष्टींचा सामना

ठळक मुद्दे'स्त्री'मध्ये श्रद्धा कपूर भूताच्या भूमिकेत दिसले हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहेपहिल्यांदाच राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर एकत्र स्क्रिन शेअर करतायेत

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' ट्रेलर रिलीज झालेल्यानंतर यासिनेमाला घेऊन अनेक चर्चा होतायेत. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे ज्याची टॅग लाईन 'मर्द को दर्द होगा' अशी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी शूटिंग दरम्यानच्या काही इंटरेस्टिंग गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी सांगितले शूटिंग दरम्यान स्त्रीच्या टीमसोबत अनेक विचित्र घटना घडल्या.  
 'स्त्री'चे शूटिंग मध्य प्रदेशमधील चंदेरी गावात झाली आहे. चंदेरी गावातील लोकांनी त्यांना सांगितले होते की रात्रीच्या वेळी सूमसाम रस्त्यांवर शूटिंग करु नका. मात्र बिझी शेड्यूलमुळे त्यांनी यागोष्टीकडे दुर्लक्ष करुन रस्त्यावर शूटिंग सुरु केले आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र या अडचणींचे नेमके कारण त्यांना कळू शकले नाही. शूटिंग करताना रात्री फोकस पुलरने नीट फोकस होऊ शकायचे नाही. कधी कधी लाईट बंद व्हायची आणि बल्ब फुटून जायचे. जोपर्यंत सकाळ व्हायची नाही शूटिंग पूर्णपणे सुरु होऊ शकायचे नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की ज्या परिसरात तुम्ही शूटिंग करायचा ती हॉन्टेड जागा आहे. 


श्रद्धा यात भूताच्या भूमिकेत दिसले तर राजकुमार राव पीडित टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  सिनेमाचे लेखन राज आणि डिकेने केले आहे. सिनेमाची निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 31 ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.  

Web Title: During Stree movie shooting Rajkumar Rao and Shraddha Kapoor had to deal with these strange things