लॉकडाउनच्या काळात शूटिंग कोमात, पण महेश बाबूचे काम जोमात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 08:00 IST2020-04-17T08:00:00+5:302020-04-17T08:00:00+5:30

लॉकडाउनच्या काळात महेश बाबूकडे या गोष्टीच्या रांगा लागल्या आहेत.

During the lockdown, shooting was in a trance, but Mahesh Babu's work was in full swing tjl | लॉकडाउनच्या काळात शूटिंग कोमात, पण महेश बाबूचे काम जोमात  

लॉकडाउनच्या काळात शूटिंग कोमात, पण महेश बाबूचे काम जोमात  

सुपरस्टार महेश बाबू केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी नव्हे तर संपूर्ण देशातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असून आपली देशभरातील प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या जोरावर प्रत्येक चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनला आहे.

सध्याच्या काळात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे आणि याचा फायदा घेत अनेक चित्रपट निर्मात्यांनी महेश बाबूकडे आपल्या चित्रपटाच्या स्क्रीप्ट्स पाठवायला सुरुवात केली आहे. महेश बाबू यावेळी आपल्या घरीच वेळ घालवत आहे त्यामुळे त्यांच्याकडे या स्क्रीप्टस वाचण्यासाठी नक्कीच वेळ असेल, याची या निर्मात्यांना खात्री आहे.  



महेश बाबूची अपार लोकप्रियता आणि दर्शकांकडून त्याला मिळणारे प्रेम त्याच्या प्रत्येक चित्रपटाला बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट बनवत आहेत. महेश बाबू वास्तवातच एक उत्तम अभिनेता आहे आणि स्क्रीनवरचा त्यांचा वावर प्रेक्षकांना वेड लावतो. आणि याच कारणासाठी अनेक चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटात महेश बाबूला घेण्यासाठी उत्सुक आहेत.



महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'सरिलरु नीकेवरु' ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट 100 करोड़चा आकड़ा गाठणारा महेश बाबूचा लागोपाठ तीसरा सिनेमा ठरला आहे. यामध्ये प्रथमच महेश बाबू एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता.

Web Title: During the lockdown, shooting was in a trance, but Mahesh Babu's work was in full swing tjl