'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता

By तेजल गावडे | Published: October 22, 2020 06:26 PM2020-10-22T18:26:38+5:302020-10-22T18:27:19+5:30

'छलांग' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगणने त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

"Due to gadgets, today's children give less priority to outdoor sports," said Ajay Devgn | 'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता

'गॅजेटमुळे हल्लीची मुलं मैदानी खेळाला कमी प्राधान्य देतात', अजय देवगणने व्यक्त केली चिंता

googlenewsNext

छलांगच्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून हा चित्रपट उत्तर भारतातील एका शाळेतील पीटी टीचरच्या आनंददायक परंतु प्रेरणादायक प्रवासाबद्दल आहे. मोन्टू (राजकुमार राव) एक टिपिकल पीटी टीचर आहे, मात्र ही त्याच्यासाठी केवळ नोकरी आहे. मात्र एका वळणावर, मॉन्टूच्या आयुष्यात नीलू (नुसरत भरुचा) ची एन्ट्री होते आणि त्यामुळे मोन्टूला कधीही न केलेले काम करायला भाग पाडले जाते, ते म्हणजे शिकवणे.

अजय देवगनने आपल्या बालपणातील काही खास आठवणींना उजाळा देताना सांगितले की, 'माझ्या अशा काही खास आठवणी नाहीत, मात्र जेव्हा आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आमच्याकडे आजच्या मुलांसारखे गॅजेट्स नव्हते. आमचे मनोरंजन फिजीकल असायचे, जे मी आजच्या काळातील मुलांमध्ये मिस करतो. मी प्रत्येक वेळी बाहेर मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांच्या मागे लागलेला असतो कारण कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्सवर खेळण्यापेक्षा त्यांनी बाहेर खेळणे खूप महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.'

तो पुढे म्हणतो की, 'फिजिकल एक्टिविटी हेच केवळ आमच्या मनोरंजनाचे साधन होते, आणि त्यामुळेच आम्ही त्याचा भरपूर आनंद घेतला. आज मुलांकडे खूप सारे पर्याय आहेत त्यामुळे ते खूप साऱ्या गोष्टी करत असतात. आमच्या वेळच्या मनोरंजनाविषयी बोलायचे झाल्यास, आम्ही खेळ खेळत होतो आणि ते कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ असू शकतील, केवळ क्रिकेट किंवा फुटबॉलच नाही तर काहीही. मी खूप मस्तीखोर होतो आणि त्यासाठी आम्ही अनेकदा मोठ्यांचा ओरडा देखील खाल्ला आहे, मात्र हे सगळेच खूप मजेशीर होते कदाचित आमच्या बालपणीच्या सर्वात अविस्मरणीय क्षणांमधील एक. केवळ आपल्या मित्रांसोबत भटकणे आणि आपल्या जीवनातील सर्वात चांगला वेळ व्यतीत करणेच, सर्व काही होते.'

हंसल मेहता द्वारे दिग्दर्शित हा चित्रपट लव्ह फिल्म्स प्रॉडक्शनचा असून गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांची प्रस्तुती आहे.

अजय देवगण, लव्ह रंजन, अंकुर गर्ग निर्मित या चित्रपटात अष्टपैलू अभिनेते राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्यासह सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, झीशान अयूब, इला अरुण आणि जतिन सरना मुख्य भूमिकेत आहेत.

 

Web Title: "Due to gadgets, today's children give less priority to outdoor sports," said Ajay Devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.