अखेर अधूरंच राहिलं सुशांत सिंग राजपूतचे हे स्वप्न, वाचून तुम्हालाही वाटेल वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 08:00 IST2020-06-16T08:00:00+5:302020-06-16T08:00:00+5:30

सुशांत सिंग राजपूतचे या ठिकाणी जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

This dream remained unfulfilled ..! The land was bought by Sushant Singh Rajput on the moon | अखेर अधूरंच राहिलं सुशांत सिंग राजपूतचे हे स्वप्न, वाचून तुम्हालाही वाटेल वाईट

अखेर अधूरंच राहिलं सुशांत सिंग राजपूतचे हे स्वप्न, वाचून तुम्हालाही वाटेल वाईट

सुशांत सिंग राजपूतच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत अनंतात विलीन झाला आहे. सुशांतचे वडिल आणि चुलत भाऊ सकाळीच पटाणावरुन मुंबईत आले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सगळ्यांना धक्का बसला आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सुशांतच्या निधनावर वेगवेगळ्या प्रकारे शोक व्यक्त करत आहेत.

सुशांतने त्याच्यामागे बरीच प्रॉपर्टी मागे ठेवली आहे. त्यापैकी एक म्हणजे त्याने चंद्रावरही (moon) जमीन विकत घेतली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न अपूर्ण राहिले.



सुशांतला चंद्रावर जायचे होते. काही वर्षांपूर्वी चंद्रावरील सी ऑफ मस्कॉवी रिजनमधील जमिनीचा एक तुकडाही त्याने खरेदी केला होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने आपली चंद्रावरील ही जागा दाखवली होती. 'द माय साइड ऑफ मून  #dreams' असे कॅप्शन सुशांतने या फोटोला दिले होते.


 नासाच्या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील आपल्या या ठिकाणी जाण्याची इच्छाही सुशांतने व्यक्त केली होती. चंदामामा दूर के या सिनेमात सुशांत अंतराळवीराची भूमिका साकारताना दिसणार होता. यासाठी त्याने नासामध्ये ट्रेनिंगही घेतलं होतं. मात्र कारणामुळे हा प्रोजेक्ट सुरू झाला नाही. सुशांतला नासाच्या 2024 च्या चांद्रमोहिमेत जायचे होते आणि त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली होती.
 

Web Title: This dream remained unfulfilled ..! The land was bought by Sushant Singh Rajput on the moon