‘हाफ गर्लफ्रेंड’ कॅटने का नाकारला, जाणून घ्यायचेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:42 IST2016-12-01T17:34:51+5:302016-12-01T17:42:37+5:30

सध्या ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे तो चित्रपट म्हणजे ‘ हाफ गर्लफ्रेंड ’. चेतन भगत लिखित ‘हाफ गर्लफ्रेंड’ ...

Do you want to know why the 'half girlfriend' catechism is rejected? | ‘हाफ गर्लफ्रेंड’ कॅटने का नाकारला, जाणून घ्यायचेय?

‘हाफ गर्लफ्रेंड’ कॅटने का नाकारला, जाणून घ्यायचेय?

्या ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे तो चित्रपट म्हणजे ‘हाफ गर्लफ्रेंड’. चेतन भगत लिखित ‘हाफ गर्लफ्रेंड’ कादंबरीवर आधारित चित्रपटात अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत दिसतील. पण, तुम्हाला माहितीये का ? श्रद्धा कपूरच्या अगोदर कॅटरिना कैफ हिची निवड करण्यात आली होती. कॅटला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असतांनाही चित्रपट साईन करण्यास नकार दिला होता. आता तिने असे का केले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 



‘बार बार देखो’ अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला दिग्दर्शक मोहित सुरी यांनी श्रद्धा कपूरअगोदर रियाच्या भूमिकेसाठी कॅटला निवडले होते. मात्र, ‘कॉलेजगर्लच्या रोलमध्ये मी योग्य दिसणार नाही. तसेच अर्जुन कपूरसोबतही मी वयाने खुप मोठी वाटेल,’ हे कॅटचे उत्तर ऐकताच दिग्दर्शकांना तिच्यातील प्रामाणिकपणाचे आणि तिच्या निर्णयाचे कौतुक वाटले. त्यानंतर सुरी यांनी कॉलेजवयीन चेहरा शोधला आणि श्रद्धा कपूरच्या रूपात त्यांना या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्री मिळाली. 



‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाची शूटिंग जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून टीमने फार कमी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांची चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता तशीच टिकून राहावी म्हणून फोटो आणि व्हिडीओ यांच्यासंदर्भात गोपनियता पाळण्यात आली. 

Web Title: Do you want to know why the 'half girlfriend' catechism is rejected?