'मैंने पायल है छनकाई...' फेम गायिका फाल्गुनी पाठक आठवतेय का?, नवरात्रीतला लेटेस्ट व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 15:58 IST2025-09-27T15:58:25+5:302025-09-27T15:58:54+5:30
Falguni Pathak : 'मैने पायल है छनकाई' व्यतिरिक्तही फाल्गुनी पाठकने अनेक गाणी गायली आहेत, जी खूप व्हायरल झाली आहेत. नवरात्रीच्या काळात फाल्गुनी पाठक अनेक लाइव्ह इव्हेंट्स करते.

'मैंने पायल है छनकाई...' फेम गायिका फाल्गुनी पाठक आठवतेय का?, नवरात्रीतला लेटेस्ट व्हिडीओ आला समोर
'मैने पायल है छनकाई' (Maine Payal Hai Chhankai) हे गाणं ९० च्या दशकात खूप गाजलं होतं. १९९९ मध्ये रिलीज झालेलं हे गाणं आवडीने ऐकलं जातं आणि सांस्कृतिक कार्यक्रमात यावर डान्स पाहायला मिळतात. हे गाणं गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak)ने गायलं आहे. 'मैने पायल है छनकाई' व्यतिरिक्तही फाल्गुनी पाठकने अनेक गाणी गायली आहेत, जी खूप व्हायरल झाली आहेत. नवरात्रीच्या काळात फाल्गुनी पाठक अनेक लाइव्ह इव्हेंट्स करते. गरब्याचा विषय निघताच प्रत्येकजण फाल्गुनीच्या गाण्यांचीच नावं घेतो. ती फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसते, त्यामुळे ती सध्या कुठे आहे, हे जाणून घेऊया.
नवरात्रीच्या निमित्ताने फाल्गुनी पाठक देशाच्या अनेक भागांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स करतात. तिच्या शोची फीस देखील खूप जास्त असते. फाल्गुनीने आतापर्यंत अनेक अल्बम्स बनवले आहेत, पण तिने कधीही बॉलिवूडसाठी गाणं गायलेलं नाही. फाल्गुनीने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ती एका एनजीओशी जोडली गेली आहे आणि एकटी राहते. ती लोकांशीच आपला आनंद वाटून घेते.
गरबा आणि दांडियाचा विषय असेल आणि फाल्गुनी पाठकचं नाव आलं नाही, असं होणं शक्यच नाही. ती मागील वेळी ग्लोबल गरबा फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. जिथे तिच्या गाण्यांवर डान्स करून प्रत्येकजण पुन्हा एकदा तिचा फॅन झाला होता. फाल्गुनी पाठक देशभरात अनेक ठिकाणी परफॉर्म करते. मुंबईपासून गुजरातपर्यंत अनेक ठिकाणी तिचे लाइव्ह परफॉर्मन्स होतात. यावर्षीही नवरात्रीत फाल्गुनी पाठकची धूम पाहायला मिळत आहे, याचे व्हिडीओ स्वतः फाल्गुनी पाठक तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे.