फोटोतील या गोबऱ्या गालाच्या चिमुकलीला ओळखलंत का?, हृतिकनंतर आता सलमान खान सोबत दिसणार रोमांस करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 04:32 PM2023-03-23T16:32:34+5:302023-03-23T16:32:55+5:30

बालपणी खूप गोंडस दिसणारी ही मुलगी आता सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्री बनली आहे.

Do you recognize this cheeky little girl in the photo? After Hrithik, she will now be seen romancing Salman Khan. | फोटोतील या गोबऱ्या गालाच्या चिमुकलीला ओळखलंत का?, हृतिकनंतर आता सलमान खान सोबत दिसणार रोमांस करताना

फोटोतील या गोबऱ्या गालाच्या चिमुकलीला ओळखलंत का?, हृतिकनंतर आता सलमान खान सोबत दिसणार रोमांस करताना

googlenewsNext

फोटोतील या गोंडस चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का? लहानपणी खूप गोंडस दिसणारी ही मुलगी आता सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूड असो की टॉलिवूड, या अभिनेत्रीने आपल्या टॅलेंटच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे. ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) आहे.

हृतिक रोशनसोबत मोहेंजोदाडोमध्ये काम करणारी पूजा हेगडे सुंदर आणि स्टायलिश आहे. बाहुबली फेम प्रभाससोबत तिचा राधेश्याम चित्रपट आला आहे. पूजा हेडगेने तिच्या फिट आणि स्लिम शरीराने लाखो चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा स्वतः इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.


पूजा हेगडे सलमान खानसोबत किसी का भाई किसी का जान सिनेमात झळकणार आहे. यातील नुकतेच तिचे 'बिल्ली बिल्ली' हे गाणे खूप गाजले आणि त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. इंस्टाग्रामवर तिचे २२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.


पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती टॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि आता बॉलिवूडमध्येही तिने आपली ओळख निर्माण केली आहे. पूजाला आचार्य आणि बीस्ट सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते, अलीकडेच ती रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटात दिसली होती.

Web Title: Do you recognize this cheeky little girl in the photo? After Hrithik, she will now be seen romancing Salman Khan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.