​सुनील शेट्टीच्या चाहत्यांनो तुम्ही हे ऐकलतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 13:23 IST2016-11-28T13:23:19+5:302016-11-28T13:23:19+5:30

येत्या काळात अनेक स्टार किड्स बॉलिवूड डेब्यू करताना दिसणार आहेत. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. ...

Do you listen to fans of Sunil Shetty? | ​सुनील शेट्टीच्या चाहत्यांनो तुम्ही हे ऐकलतं का?

​सुनील शेट्टीच्या चाहत्यांनो तुम्ही हे ऐकलतं का?

त्या काळात अनेक स्टार किड्स बॉलिवूड डेब्यू करताना दिसणार आहेत. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. होय, हे नाव म्हणजे अहान शेट्टी. होय, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा हँडसम मुलगा. सुनील शेट्टीचा मुलगा अहान आता २१ वर्षांचा झाला आहे आणि बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाला आहे. अथियाच्या बॉलिवूड करिअरल सुरुवात झालेली असताना आता अहान सुद्धा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. साजिद नाडियाडवाला हे अहानला लॉन्च करणार आहेत. साजिद हे अहानचा पहिला-वहिला चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. 



गेल्या काही दिवसांपासून अहान बॉडी बनवण्यासोबतच डिक्शन सुधारण्यात बिझी आहे. त्यामुळे त्याच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा जोरात सुरु आहे. एका बातमीनुसार, अहानच्या प्रगतीमुळे साजिद इतके प्रभावित झालेत की, त्यांनी त्याला पुढच्या ट्रेनिंगसाठी लंडनला पाठवले आहे.
अहान सध्या एका अ‍ॅक्शन स्पेशालिस्टकडून ट्रेनिंग घेतोय. हे ट्रेनिंग एक्सटेंसिव्ह प्रोग्रामचा भाग आहे. यानंतर अहान मार्शल आर्ट्स शिकेले. शिवाय अन्य काही फिजिकल ट्रेनिंगही घेईल. पुढील सहा महिने अहान लंडनमध्ये आहे. यानंतर कदाचित सप्टेंबरमध्ये त्याच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाची घोषणा होणे अपेक्षित आहे. अर्थात तोपर्यंत तरी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सुनीलची लाडकी लेक अथियाने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण यातील अथिया भाव खाऊन गेली. लवकरच अथिया ‘मुबारकां’मध्ये दिसणार आहे. एकंदर काय तर अथियाचे करिअर मार्गी लागलेय. आता सुनील शेट्टी यांना अहानच्या करिअरची चिंता आहे. पण साजिद नाडियाडवाला यांचा वरदहस्त म्हटल्यावर सुनीलला चिंता नकोच...काय बरोबर ना?

Web Title: Do you listen to fans of Sunil Shetty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.