तुम्हाला माहीत आहे का विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लहानपणापासूनच ओळखतात एकमेकांना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:03 IST2017-12-12T08:33:15+5:302017-12-12T14:03:15+5:30
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ओळख एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाली असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. विराट ...
तुम्हाला माहीत आहे का विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लहानपणापासूनच ओळखतात एकमेकांना?
व राट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ओळख एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झाली असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. विराट आणि अनुष्काने पाच वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण अनुष्का आणि विराटची पहिली ओळख जाहिरातीच्या चित्राकरणादरम्यान झाली नव्हती असे अनुष्काच्या आजीचे म्हणणे आहे. अमर उजाला या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अनुष्का आणि विराट एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. ही गोष्ट अनुष्काच्या आजीनेच सगळ्यांना सांगितली आहे. अनुष्का ही मुळची उत्तराखंडमधील आहे. तिच्या आजीच्या सांगण्यानुसार विराट आणि अनुष्का एकमेकांना लहानपणापासून खूपच चांगल्या प्रकारे ओळखतात. एवढेच नव्हे तर अनुष्काच्या संपूर्ण परिवारासोबत विराटचे लहानपणापासूनच खूप चांगले नाते आहे. अनुष्का लहान असताना विराट तिच्या घरी खेळायला यायचा. अनुष्का आणि विराटने एकत्र क्रिकेट देखील खेळले आहे असे तिच्या आजीने सांगितले आहे.
अनुष्का शर्माच्या आजीने सांगितले की, अनुष्काचे वडील सैन्यात होते. ते बंगलुरूमध्ये राहात असताना अनुष्काचा भाऊ कर्णेश क्रिकेट खेळत असे आणि त्यावेळी तो विराटच्या टीममध्ये होता. कर्णेश आणि विराटने त्यावेळी अनेक क्रिकेटचे सामने एकत्र खेळले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी अखेर खरी ठरली. काल ११ नोव्हेंबरला अनुष्का आणि विराट यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत २१ तारखेला विराटच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी होणार असून अनुष्का आणि विराटच्या बॉलिवूडमधील आणि क्रिकेट क्षेेत्रातील मित्र मैत्रिणींसाठी २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईतील वरळी येथील घरात ते गृहप्रवेश करणार आहेत.
Also Read : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे हे आहेत फ्युचर प्लान्स