मलायकाचं पहिलं 'क्रश' कोण होतं माहित्येय का? रुममध्ये लावलेले अभिनेत्याचे पोस्टर, आजही जपून ठेवलाय फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:55 IST2025-11-10T14:54:30+5:302025-11-10T14:55:28+5:30
Malaika Arora's first 'crush : अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोशूट आणि व्हिडीओमुळे तर कधी गाण्यांमुळे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या जुन्या क्रशबद्दल सांगितलं.

मलायकाचं पहिलं 'क्रश' कोण होतं माहित्येय का? रुममध्ये लावलेले अभिनेत्याचे पोस्टर, आजही जपून ठेवलाय फोटो
अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोशूट आणि व्हिडीओमुळे तर कधी गाण्यांमुळे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिच्या जुन्या क्रशबद्दल सांगितलं. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यातून तिने तिच्या क्रशचा खुलासा केलाय. हा क्रश कोण असेल हे, जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून चंकी पांडे आहे.
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चंकी पांडेची लेक अनन्या पांडेची एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यात अनन्या टॉक शो 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल'मध्ये आई-वडील चंकी आणि भावना यांची प्रेमकहाणी सांगितली. अनन्याने सांगितलं की, मलायकाकडे आधी चंकी पांडेचं पोस्टर होतं, जे तिच्या रुममध्ये लावलेलं होतं. मलायकाने ही क्लीप शेअर करत लिहिले की, चंकी पांडे माझ्याकडे आताही तुमचं पोस्टर आहे. काळजी करू नका. खरेतर मलायकाचं एकेकाळी चंकी पांडेवर क्रश होतं.

यापूर्वीही मलायकाने सांगितलेलं पहिल्या क्रशबद्दल
ही पहिली वेळ नाही जेव्हा मलायकाने चंकीवरचं प्रेम व्यक्त केलं. यापूर्वी झलक दिखला जा शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसलेल्या मलायका आणि फराह खानने सांगितलं होतं की, त्या दोघींचं चंकी पांडेवर क्रश होतं. 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये फराह खानने मस्करीत म्हटले की अनन्या पांडे तिची मुलगी असू शकली असती, कारण तिलाही चंकी पांडे खूप आवडत होते. हे ऐकून अनन्या लाजली.
फराहने मस्करीत चंकी पांडेला म्हटलेलं 'कंजूष'
दरम्यान, फराहने 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये चंकी पांडेला बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती असल्याचे सांगितले होते. जेव्हा कपिल शर्माने विचारले की, फराह आणि अनिल कपूरमध्ये कोण जास्त कंजूष आहे, तेव्हा फराहने सांगितले की, ते दोघेही उदार आहेत, पण चंकी सर्वात कंजूष आहे. तिने मस्करीत म्हटले की, ती चंकीकडे ५०० रुपये मागून दाखवू शकते.