'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:20 IST2023-04-05T12:19:38+5:302023-04-05T12:20:09+5:30

Rashmika Mandanna : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने रसिकांंच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे.

Do you know how much educated 'Pushpa 2' fame Rashmika Mandanna? | 'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क

'पुष्पा २'मधील श्रीवल्लीचं शिक्षण किती झालंय माहितीये का?, वाचून व्हाल थक्क

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने रसिकांंच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिचे फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातच नाही तर जगभरातही तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. तर पुष्पा चित्रपटात तिने साकारलेली श्रीवल्ली चाहत्यांना खूपच भावली. आज तिचा वाढदिवस आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रश्मिकाने यशस्वीपणे तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.

रश्मिका मंदानाने २०१४ साली कुर्गमधून क्लीन एंड क्लियर फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला याच ब्रॅंडची जाहिरात मिळाली. याच फेसवॉशच्या जाहिरातीमध्ये एका दिग्दर्शकाची तिच्यावर नजर पडली आणि तिला पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून कलाविश्वात पदार्पण केले. तर त्यानंतर तिने २०१८ साली रोमँटिक ड्रामा चलोमधून आपल्या अभिनयाची छाप उमटविली. त्यानंतर चमक चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले. यानंतर एका पाठोपाठ रिलीज झालेले गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड दोन्हीही हिट ठरले.


अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि मग तिने या क्षेत्रात पाऊल टाकले. कुर्ग पब्लिक स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस अँड कॉमर्स महाविद्यालयातून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात बॅचलर पदवी मिळवली आहे.


रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती ॲनिमल या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकेल. तर या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिका दिसणार आहे. याशिवाय ती बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटात पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Do you know how much educated 'Pushpa 2' fame Rashmika Mandanna?