​तुम्हाला माहित आहे का? शाहीदची ‘मीरा’ करणार छोट्या पडद्यावर डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 13:34 IST2016-11-20T13:34:22+5:302016-11-20T13:34:22+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत म्हणजे बॉलिवूडच एक क्यूट जोडपं. आजपर्यंत शाहीदच्या मीराला तुम्ही केवळ ...

Do you know? Debut on small screens of Shahid's 'Meera' !! | ​तुम्हाला माहित आहे का? शाहीदची ‘मीरा’ करणार छोट्या पडद्यावर डेब्यू!!

​तुम्हाला माहित आहे का? शाहीदची ‘मीरा’ करणार छोट्या पडद्यावर डेब्यू!!

लिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत म्हणजे बॉलिवूडच एक क्यूट जोडपं. आजपर्यंत शाहीदच्या मीराला तुम्ही केवळ फोटोंमध्ये पाहिले. पण आता मीरा छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. तेही शाहीदसोबत. होय, लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या लोकप्रीय चॅट शोमध्ये मीरा शाहीदसोबत दिसणार आहे. करणच्या या शोमध्ये अलीकडे अक्षय कुमार आणि टिष्ट्वंकल खन्ना येऊन गेलेत. यानंतर शाहीद व मीरा हे दोघे गेस्ट म्हणून या शोमध्ये सहभागी होणार आहे. हा एपिसोड डिसेंबरच्या मध्यात टेलिकास्ट केला जाईल. तोपर्यंत शाहीदने संजय लीला भन्साळींच्या बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चे फस्ट शेड्यूल संपवलेले असते. अक्षय व टिष्ट्वंकलनंतर एका नव्या कोºया कपलला करण आपल्या शोमध्ये आणू इच्छित होता. असे असताना शाहीद व मीराशिवाय दुसरा कुठलाच सर्वोत्तम पर्याय नव्हता. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला शाहीदसोबतच मीरानेही तात्काळ होकार दिला. त्यामुळे मीरा व शाहीदच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
खरे तर शाहीद याआधीही या शोमध्ये आलेला आहे. करिना कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि प्रियांका चोप्रासोबत तो यापूर्वी या शोमध्ये दिसलेला आहे. या तिघींसोबतही शाहीदच्या अफेअरची चर्चा त्यावेळी जोरात होती. पण आता प्रथमच शाहीद पत्नीसोबत या शोमध्ये सहभागी होतोय. त्यामुळे करणइतकाच शाहीदही उत्सूक आहे. केवळ तेच नाही तर मीराला छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकही तितकेच उत्सूक आहेत.
 नुकताच बाप बनलेला शाहीद सध्या ‘पद्मावती’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोण (राणी पद्मावतीच्या भूमिकेत) हिच्या पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Do you know? Debut on small screens of Shahid's 'Meera' !!