इटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 19:10 IST2018-04-24T13:40:30+5:302018-04-24T19:10:30+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, करिअरच्या सुरुवातीलाच मी विविध पात्रांमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. ...
.jpg)
इटलीत लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता काय?
अ िनेत्री अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, करिअरच्या सुरुवातीलाच मी विविध पात्रांमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी स्टॅण्डर्ड चार्टड बॅँकेच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनुष्का मीडियाशी बोलत होती. यावेळी बॅँकेने तिला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. अनुष्का तिच्या नव्या जाहिरातीत मुलगी, आई आणि आजी अशा तिन्ही भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या अनुभवाविषयी अनुष्काने म्हटले की, ‘मी सुरुवातीपासूनच आपल्या भूमिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी तर मी असे चित्रपट करीत आहे, ज्यामध्ये माझ्या भूमिका अगदी विपरीत आहेत.
![]()
यावेळी अनुष्काने हेदेखील सांगितले की, यापूर्वी तिने कधीही ट्रिपल भूमिका साकारली नाही. त्यामुळे पहिल्यांदा असा प्रयोग करताना मी खूपच उत्साहित आहे. अनुष्का आगामी काळात ‘झिरो’ आणि संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये बघावयास मिळणार आहे. दरम्यान, सध्या अनुष्काचा आजीचा लूक सर्वत्र व्हायरल होत असून, त्यामध्ये तिला ओळखणे अवघड होत आहे. अनुष्का हुबेहूब आजीसारखी दिसत असल्याने इंटरनेटवर तिचे हे फोटो वाºयासारखे व्हायरल होत आहेत.
![]()
![]()
दरम्यान, यावेळी अनुष्काने कथुआ आणि उन्नावसारख्या घटनांवरही तीव्र शब्दात निषेध नोंदविला. त्याचबरोबर अशा घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षाच द्यायला हवी, असेही तिने म्हटले. पुढे बोलताना अनुष्काने म्हटले की, ‘या घटनेमुळे मला प्रचंड धक्का बसला आहे. जेव्हा मी याविषयी विचार करते किंवा बोलते तेव्हा खूपच भावुक होत असते. याप्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.’ असेही अनुष्काने म्हटले.