तुम्हाला हे माहिती आहे का ?, लवरात्रिसाठी सलमान खानची पहिली पसंती होती ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 10:11 IST2018-02-07T04:35:40+5:302018-02-07T10:11:35+5:30
सलमान खान लवकरच अर्पिता खानचा पती आयुष शर्माला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आयुषला बॉलिवूडमध्ये ...
.jpg)
तुम्हाला हे माहिती आहे का ?, लवरात्रिसाठी सलमान खानची पहिली पसंती होती ही अभिनेत्री
स मान खान लवकरच अर्पिता खानचा पती आयुष शर्माला लवकरच बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आयुषला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची चर्चा आहे. लवरात्रिमध्ये आयुषच्या अपोझिट वारिना हुसैनला साईन देखील करण्यात आले आहे. मात्र हे तुम्हाला माहिती आहे का या भूमिकेसाठी सलमानची पहिली पसंती वारिना नाही तर दुसरी अभिनेत्री होती.
मिळालेल्या माहितीनुसार यात सलमानला कॅटरिनाची छोटी बहिण इसाबेल लाँच करायचे होते. ऐवढेच नाही तर लवरात्रि चित्रपटात तो तिला घेणार सुद्धा होता मात्र त्यानंतर इसाबेलने काही असे केले की सलमानने आपला विचार बदलला.
Spotboyच्या रिपोर्टनुसार, इसाबेल लवरात्रि चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सुद्धा गेली होती. त्याच्या लूक टेस्ट सुद्धा करण्यात आला. मात्र ऑडिशन दरम्यान ती कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे सलमानने आपला विचार बदलला. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसमधील एक व्यक्तीने सांगितले या चित्रपटातील अभिनेत्रीला हिंदी आणि गुजराती येणे आवश्यक होते.
इसाबेल या भाषा न येत असल्यामुळे तिची अडचण झाल्याचा अंदाज लावण्यात येतो आहे. सध्या इसाबेल हिंदी भाषा शिकते आहे. एक मात्र नक्की इसाबेल बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्यासाठी आतुर आहे. तर दुसरीकडे अशी चर्चा आहे की ती ‘टाईम टू डान्स’ असे या चित्रपटातून पदार्पण करते आहे. चार वर्षांपूर्वीही तिने बॉलिवूडमध्ये येण्याचा एक प्रयत्न करून पाहिला होता. त्यावेळी तिच्या वाट्याला अपयश आले होते.
ALSO READ : भाईजान सलमान खानला‘लडकी मिल गयी’, दबंग खानच्या ट्विटमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
या चित्रपटात तिच्या अपोझिट सूरज पंचोली असणार आहे. २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटादरे सूरजने बॉलिवूड डेब्यू केला होता.‘टाईम टू डान्स’ हा चित्रपट एक डान्सवर आधारित चित्रपट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज व इसाबेलने या चित्रपटासाठी तयारीही सुरू केली आहे. येत्या मे महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याची शक्यता आहे. कोरिओग्राफर रेमो डिसूजाचा अस्टिस्टंट डायरेक्टर स्टॅनले डिकोस्टा हा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.