DON'T MISS : ​दाऊदच्या बहीणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूरचा दमदार फर्स्ट लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 11:16 IST2017-02-06T05:46:54+5:302017-02-06T11:16:54+5:30

श्रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण(अर्थात सिनेमात) बनणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज या चित्रपटाचा फर्स्ट ...

DO NOT MISS: Shraddha Kapoor's first look in the role of Dawood's sister! | DON'T MISS : ​दाऊदच्या बहीणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूरचा दमदार फर्स्ट लूक!

DON'T MISS : ​दाऊदच्या बहीणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूरचा दमदार फर्स्ट लूक!

रद्धा कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण(अर्थात सिनेमात) बनणार, अशी ब-याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला. श्रद्धाने ‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ या तिच्या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर्स जारी केली. या पोस्टरवर डोळ्यांत ‘सुरमा’ लावलेली गंभीर मुद्रेतील श्रद्धा दिसते आहे. हीच का ती ग्लॅमरस रोल करणारी श्रद्धा ? असा सवाल प्हे पोस्टर पाहून कुण्याच्याही मनात आल्याशिवाय राहणार नाही.

‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ हा चित्रपट दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा साकारणार असलेली व्यक्तिरेखा १७ ते ४० वर्षे वयोगटातील असणार आहे. निश्चितपणे यासाठी श्रद्धाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अलीकडे एका मुलाखतीदरम्यान खुद्द श्रद्धाने हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारणे तिच्यासाठी एक आव्हान असल्याचे म्हटले होते. या भूमिकेला अधिकाधिक जिवंत करण्याचे माझे प्रयत्न आहेत. मी यासाठी अपार मेहनत घेतेय. प्रत्यक्षात हसीना पारकर यांना मला भेटता येणार नाही, याचे मला दु:ख आहे,(हसीना पारकर हिचे २०१४ मध्ये निधन झाले.) असे श्रद्धा म्हणाली होती.

{{{{twitter_post_id####}}}}


या चित्रपटातील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, यात दाऊदच्या भावाची भूमिका श्रद्धाचा रिअल लाईफ ब्रदर सिद्धांत कपूर हा साकारणार आहे. याशिवाय नव्या अंदाजातील श्रद्धा ही आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तर आहेच. साहजिक श्रद्धाचे चाहते या आव्हानात्मक भूमिकेत तिला पाहण्यास उत्सूक आहेत. पण त्यासाठी आपणासर्वांना जुलैची प्रतीक्षा करायला हवी. कारण अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट जुलै महिन्यात पे्रक्षकांच्या भेटीय येतो आहे.

ALSO READ : का झाले श्रद्धा कपूरचे अश्रू अनावर! 
​श्रद्धा कपूरने करिअरसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
 

Web Title: DO NOT MISS: Shraddha Kapoor's first look in the role of Dawood's sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.